मुंबई, 30 मे : सध्या मुंबईतच नाही तर अनेक ठिकाणी सोशल मीडिया (Social Media)च्या माध्यमातून अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक (fraud) केली जाते. विशेष करून फेसबूक (Facebook) या सोशल मीडियावर अनेकांची फसवणूक केल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. फेसबूक या सोशल मीडियावर ज्या व्यक्तीचे अकाऊंट आहे त्याच व्यक्तीचे बनावट अकाऊंट तयार करून त्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमधील अनेकांना पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवून फसवणूक केल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. असाच एक प्रकार मुंबईमध्ये पुन्हा एकदा समोर आला असून या वेळेस चोरट्यांनी राज्य राखीव दलाच्या एका जवानाला टार्गेट केले आहे.
राज्य राखीव दलाचे जवान मनोहर पाटील यांचे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील अनेकांना या चोरट्याने पैशांची गरज असल्याचे मेसेज पाठवले. याच मेसेजला बळी पडून मनोहर पाटील यांचा चुलत भाऊ जो गुजरात येथे राहतो त्याने मनोहरला म्हणजेच मनोहरचे बनावट फेसबूक अकाऊंट बनवणाऱ्याला टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये पाठवले होते. पैसे देऊन सुद्धा मनोहरने एकदाही फोन न केल्याने मनोहरच्या भावाला संशय आला आणि त्याने मनोहरला फोन केला आणि पाठवलेल्या पैशांबाबत विचारले असता आपण असे कोणतेच पैसे मागितले नाही किंवा घेतले नाही असं मनोहरने त्याच्या भावाला सांगताच भावाच्या पायाखालची जमीन सरकली.
Vasai : पोलीस बनून लुटणाऱ्या भामट्याला अटक, रतन टाटांशी संबंध असल्याच्या मारत होता बाता
याचप्रमाणे अनेकांना आपल्या फेसबूक या सोशल मीडिया अकाऊंटवरून पैशांची गरज असल्याचे मॅसेज गेल्याचे मनोहरच्या लक्षात आल्यानंतर मनोहरने उत्तर प्रदेशिक सायबर सेलमध्ये तक्रार केली. या तक्रारी वरून अशाच प्रकारे मनोहरच्या फेसबूक अकाऊंट वरून अनेकांना मेसेज केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबरीने मनोहरचा गुजरातचा भाऊ ज्याने मनोहरच्या सांगण्यावरून मनोजला पैसे पाठवले होते असं ऑनलाईन चोरट्याने मनोजच्या भावाला फसवले होते त्या सर्व अकाऊंटची माहिती घेऊन या बँकेत मनोहरच्या भावाने पैसे पाठवले होते. त्या बँकेची तात्काळ संपर्क करून पोलिसांनी या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ते खाते गोठवले ज्यामुळे मनोहरच्या भावाचे पैसे चोरण्यापासून वाचले.
मनोहरने वेळीच पोलिसांशी संपर्क साधने त्याच्या भावाची झालेली फसवणूक उघडकीस आली. शिवाय भावाचे पैसे देखील परत मिळू शकले पण प्रत्येकवेळी असं होईलच असं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सोशल मीडियावर पैशाची मागणी करणारे किंवा विविध ठिकाणावरून बोलत आहोत असं सांगून ओटीपी मागून अनेकांची फसवणूक केली जाऊ शकते. ज्यामुळे अशा फसवणुकीपासून आपला बचाव करायचा असेल तर जोपर्यंत पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत समोरच्याला पैशाची मदत करायची नाही. तसेच कधीच कोणत्याही फोनवरील व्यक्तीला किंवा कुठल्याही व्यक्तीला आपल्या बँकेत संदर्भातील ओटीपी मेसेज कधीच द्यायचं नाही. या काही शुल्लक गोष्टी आहेत ज्यांचे पालन आपण केले तर अशा पद्धतीच्या ऑनलाईन फ्रॉडपासून आपले रक्षण होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.