S M L

उद्यापासून पावसाळी अधिवेशन, हे मुद्दे गाजणार ?

राज्य विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय

Sachin Salve | Updated On: Jul 23, 2017 02:04 PM IST

उद्यापासून पावसाळी अधिवेशन, हे मुद्दे गाजणार ?

23 जुलै : राज्य विधिमंडळाचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. कर्जमाफी आणि त्यावरून झालेला गोंधळ यावर विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे तर विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी सरकारनही जोरदार मोर्चेबांधणी केलीय.

सरकारनं दिलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. पेरणी तोंडावर असताना सरकारने कर्जमाफीचा घोळ घातला. बियाण्यांसाठी 10 रुपये अॅडव्हांस देण्याची घोषणा केली मात्र त्याचे आदेश शेवटपर्यंत निघालेच नाहीत. अशा अनेक मुद्यावर विधिमंडळात रणकंदन होण्याची शक्यता आहे.

हे मुद्दे गाजणार ?

कर्जमाफीचा गोंधळ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न

Loading...
Loading...

तूर खरेदीचा घोळ आणि शेतकऱ्यांचं नुकसान

झोपु योजनेतला भ्रष्टाचार

समृद्धी महामार्गासाठीच्या जमिनीचं अधिग्रहण

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरण आणि राज्यातली कायदा-सुव्यवस्था

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 23, 2017 02:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close