Home /News /mumbai /

या आत्महत्यांची जबाबदारी घेणार का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

या आत्महत्यांची जबाबदारी घेणार का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis 'एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे.'

मुंबई 9 नोव्हेंबर: रखडलेलं वेतन आणि तोंडावर आलेला दिवाळीचा (Diwali) सण यामुळे चिंतेत असलेल्या राज्यातल्या दोन ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनांनी राज्यात खळबळ उडालेली असताना त्यावर आता आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. वेतन न मिळाल्याने दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या, या अतिशय वेदनादायी आणि मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारने हालचाल केली नाही आता या आत्महत्येची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरे सरकारला केला आहे. फडणवीस म्हणाले, एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही 2 कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत.जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार. या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल त्यांनी केलाय. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन केलंय. तातडीने पगाराचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, आत्महत्यासारखं कठोर पाऊल उचलू नका. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. दुःखी होऊन अश्या कोणत्याही टोकाचं पाऊल घेऊ नये. अशा निर्णयामुळे कुटुंबाला त्याचा त्रास होतो कुटुंब रस्त्यावर येत, दिवाळी आधी 1 पगार मिळेल आणि दिवाळीनंतर 1 पगार मिळेल. पूर्णपणे सगळ्या गोष्टी बघावा लागतात. बँकेकडे कर्ज पण मागितलं आहे. टप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. आज 1 तासात 1 पगार आणि सणाचा अनुग्रह मिळेल. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालाय अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. आता एस टी साठी कोणतीही रक्कम थकीत नाही. राज्य शासनाला प्रस्ताव दिलाय की काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे. अनेक माध्यमातून पैसे एस टी मध्ये येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. आज पगार आणि डिझेलमध्ये पैसे खर्च होतात. एक रकमी पैसे आले तर पुढचं प्लॅनिंग थोडं सोपं होईल अशी आशा आहे. आमचं प्लॅनिंग आहे 3 हजार बसेस करायचं. राज्य सरकारकडून, प्रायव्हेट कडून काम मिळाली तर एस टी ला फायदा होईल. एस टी वहातुक दरी बैठक सुरू आहे. अवैद्य प्रवाशांना चाप लावणं गरजेचं आहे. त्यासाठी आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. कडक कारवाई करावी लागणार पण आधी एस टीचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Devendra Fadnavis

पुढील बातम्या