मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अधिवेशन गाजवणाऱ्या भास्कर जाधवांना अज्ञातांकडून धमक्या, सरकारने पुरवली सुरक्षा!

अधिवेशन गाजवणाऱ्या भास्कर जाधवांना अज्ञातांकडून धमक्या, सरकारने पुरवली सुरक्षा!

 अधिवेशनाच्या काळात झालेल्या गोंधळानंतर सुरक्षा पुरवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

अधिवेशनाच्या काळात झालेल्या गोंधळानंतर सुरक्षा पुरवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

अधिवेशनाच्या काळात झालेल्या गोंधळानंतर सुरक्षा पुरवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

मुंबई, 07 जुलै: पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Maharashtra assembly) गाजवणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना महाविकास आघाडी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहे. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात कडक कामगिरी बजावली. जाधव यांनी भाजप आमदारांना हटकले असता त्यांच्या अंगावर धावून गेले. एवढंच नाहीतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाधव यांना शिवीगाळ सुद्धा केली. हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भास्कर जाधव यांना धमकी दिल्या जात होत्या.

थेट घरात घुसून केली राष्ट्राध्यक्षांची हत्या; जग हादरवणारी घटना

याबद्दल त्यांनी सभागृहात याची माहिती दिली. त्यानंतर भास्कर जाधव यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर आज  भास्कर जाधव यांना सरकारने सुरक्षा पुरवली आहे.

दोन सुरक्षारक्षक भास्कर जाधव यांना पुरवण्यात आले आहे. अधिवेशनाच्या काळात झालेल्या गोंधळानंतर सुरक्षा पुरवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.  जाधव यांना धमकी देत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.त्यानंतर गृह खात्याने ही सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.

‘दिलीप कुमारांची झलक पाहण्यासाठी सायकलवरुन गेलो’; शरद पवारांनी सांगितला किस्सा

दरम्यान, 'अधिवेशनात काय घडलं हे सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे सीसीटीव्ही विषयी मी बोललो नाही. जर त्यांच्याकडे फुटेज असेल आणि इतर पक्षाचे आमदार असतील तर त्यांच्यावर ही कारवाई करा आणि जर मी दोषी असेल तर माझ्यावर ही कारवाई करा. भाजप या प्रकरणी कोर्टात जात असतील तर त्यांनी जावं. कारण,  भाजपला कोणीच आणि कुठे ही अडवू शकत नाही, असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपला लगावला.

कोकणातील लोक सुसंस्कृत आहेत. मात्र काही बिघडलेले आहेत. मंत्रिपद मिळतंय की नाही हे मला माहित नाही जर मिळत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोलाही जाधव यांनी राणेंना लगावला.

First published:
top videos

    Tags: Shivsena