Home /News /mumbai /

वाढत्या कोरोनामुळे पुन्हा सामान्यांसाठी मुंबई लोकल बंद होणार का? रेल्वे प्रशासनाने केला मोठा खुलासा

वाढत्या कोरोनामुळे पुन्हा सामान्यांसाठी मुंबई लोकल बंद होणार का? रेल्वे प्रशासनाने केला मोठा खुलासा

Mumbai Local Train Latest News: मुंबईत कोरोनाच्या केसेस पुन्हा एकदा वाढत आहेत. अशावेळी राज्य शासन लोकल सेवेबाबात काय पाऊल उचलतं याकडं सगळ्यांचंच लक्ष आहे.

    मुंबई, 23 फेब्रुवारी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona virus cases) गेले 8 ते 9 महिने सर्वसामान्यांसाठी (common citizens) मुंबई लोकल (Mumbai local) बंद होती. 1 फेब्रुवारीपासून लोकल पुन्हा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. आता मात्र मुंबईत कोरोनाच्या केसेस वाढण्यासाठी (rising corona cases) लोकलसंदर्भातल्या या निर्णयाला जबाबदार धरलं जात आहे. मात्र मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही रेल्वेजनी (Western and central railway) याबाबत खुलासा केला आहे, की प्रवास करत असताना नागरिक कोरोनाबाबतचे प्रोटोकॉल्स (corona protocols) पाळतील याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. वेस्टर्न रेल्वेचे चीफ पीआरओ (Western railway CPRO) सुमित ठाकूर (म्हणाले, की आम्ही सगळे प्रतिबंधात्मक उपाय करत पूर्वकाळजी घेतलेली आहे. वेस्टर्न रेल्वे कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सर्व गरजेची पावलं उचलते आहे. आम्ही ट्रेनचे सर्व डबे सतत सॅनिटाईज करत आहोत. याकामी आम्ही एक खास टीमच लावलेली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही 300 हून अधिक बुकिंग काउंटर्स खुले केले आहेत. 1300 लोकल ट्रेन्स सध्या सुरू आहेत. राज्य शासनानं (state government) दिलेल्या सूचनांचं आम्ही सर्वतोपरी पालन करतो आहोत.' ते पुढे म्हणाले, 'शासन आणि बीएमसीच्या (BMC) मदतीनं आम्ही जे लोक कोरोनासंबंधीचे नियम पाळत नाहीत त्यांना दंडही करत आहोत. आजवर 2,400 लोकांना असा दंड (fine) केला गेला असून 3 लाख रुपये या दंडाच्या स्वरूपात जमले आहेत.' मध्य रेल्वेचे चीफ पीआरओ सुतार म्हणाले, 'सतत मास्क घालण्याच्या सूचना सर्व स्टेशन्सवर नियमितपणे दिल्या जात असून या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडही केला जातो आहे. आमच्याकडे RPF आणि GRP च्या टीम्स (RPF and GRP Teams) आहेत. या टीम्स जिथं गर्दीचं व्यवस्थापन (crowd management) करावं लागतं अशा संवेदनशील केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी आणि माणसांच्या एकत्र येण्याच्या शक्यता उद्भवत नाहीत.' असं असलं तरी मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी सांगते, की पुन्हा लोकल ट्रेन्स सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा निर्णय हा कोरोनाच्या वाढलेल्या केसेसचं कारण बनला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत रोजच्या पॉझिटिव्ह केसेस 400 होत्या. मात्र फेब्रुवारीचा पहिला आठवडा संपताना त्या रोजच्या दिवसासाठी 500 च्या पुढे गेल्या. 13 फेब्रुवारीपर्यंत या केसेस रोज 599 होत्या आणि 20 फेब्रुवारीपर्यंत त्या 897 झाल्या. हा आकडा मागील डिसेंबरपासून सर्वात उच्चांकी आहे. आता मुंबई महापालिकेनं आपल्या कारवाईची पद्धत अधिकच कडक केली आहे. राज्य सरकार सध्या परिस्थितीचं निरीक्षण करतं आहे. जर परिस्थिती अशीच राहिली आणि केसेस वाढतच राहिल्या तर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. हेही वाचा VIDEO: महापौर Kishori Pednekar यांच्याकडून मास्क वापरण्याबाबत जनजागृती असं असलं तरी, ठाकूर यांच्या मते, राज्य शासनानं लोकलसेवा सामान्यांसाठी बंद करण्याबाबत अजूनतरी काही प्रस्ताव दिलेला नाही. राज्य सरकार ज्या सूचना देईल त्यांचं आम्ही पालन करू असं ठाकूर म्हणाले. सध्यातरी 95 टक्के लोकलसेवा पूर्ववत सुरू झालेली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवेचा लाभ सध्या 22 लाख नागरिक घेत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BMC, Coronavirus, Mumbai local

    पुढील बातम्या