मुंबईकरांच्या घराची वणवण संपली; आता मिळणार स्वस्तात घरं!

राज्य सरकारच्या या निर्णयात १४.४० लाख घरांच्या निर्मितीचा सामंजस्य करार करण्यात आलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2018 09:41 AM IST

मुंबईकरांच्या घराची वणवण संपली; आता मिळणार स्वस्तात घरं!

20 फेब्रुवारी : ही बातमी आहे मुंबईकरांना खूश करणारी. कारण राज्यासह मुंबईकरांसाठी लवकरच स्वस्त घरं मिळणार आहेत. २०२२पर्यंत सर्वांना स्वस्तात घरं देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाच्या शोधात मुंबईत येणाऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे. यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई या परिसरात ही घरं बांधण्यात येणार आहेत. मुंबईची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर मुंबईची आर्थिक घडी बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयात १४.४० लाख घरांच्या निर्मितीचा सामंजस्य करार करण्यात आलं आहे. तसंच मुंबई महानगर परिसरात साडेपाच लाख घरं मिळणार आहेत. त्यामुळे मुंबईत आपलंही घर असाव असं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांची लवकरच स्वप्नपुर्ती होणार आहे.

राज्य सरकारच्या या योजनेत घरांची किंमत साधारणपणे १५ ते ६० लाखांदरम्यान असेल. यामध्ये नरेडकोतर्फे तीन लाख तर एमसीएचआयतर्फे अडीच लाख परवडणारी घरं बांधण्यात येणार आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्यांना दिलास मिळणार आहे. आता या योजनेच्या अमलबजावणीला कधी सुरूवात होणार याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागले आहे.

स्वस्त घरांचा पाऊस 

- 2022 पर्यंत एकूण 14.40 लाख स्वस्त घरं

Loading...

- मुंबई उपनगर परिसर - 5.50 लाख घरं

- क्रेडाईकडून 1 लाख कोटींची गुतवणूक

- नरेड्कोकडून 90 हजार कोटींची गुंतवणूक

- एमसीएचआयकडून 75 हजार कोटींची गुंतवणूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2018 08:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...