मुंबई 04 ऑगस्ट: गणेशोत्सवासाठी कोकणात जायला परवानगी मिळणार किंवा नाही याबाबत गेले अनेक दिवस कमालीची उत्सुकता होती. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियम पाळावे लागणार असून त्याचं पालन करूनच जावं लागणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता क्वारंटाइनचा कालावधी हा 10 दिवसांचा करण्यात आला आहे. तर सात हजार गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मंगळवारी (4 ऑगस्ट) संध्याकाळ 6 वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरू होणार आहे.
एस टी मध्ये 22 लोकांना प्रवास करता येईल. मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील मध्ये कुठेही थांबणार नाहीत. जेवण स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एस टी थांबणार नाही. फक्तं 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबणार आहे.
खासगी बस चालकांना एस. टी. पेक्षा दीड पटच दर आकारता येणार आहे. नाहीतर कारवाई करण्यात येईल.
मुंबईतील सांताक्रुझमध्ये नाल्यात 2 घरं कोसळली,2 मुली आणि महिला बेपत्ता
कोकणवासीयांना 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. 12 तारखेला रात्री 12 पर्यंत पोहचतील ते होम क्वारंटाइन होतील.
ज्यांना 12 तारखे नंतर जायचं असेल त्यांना 48 तास पूर्वी कोविड 19 चाचणी करावी करावी लागेल ती निगेटीव्ह आली तरच त्यांनी कोकणात जावं असाही नियम करण्यात आला आहे.
भाजपसहीत अनेक पक्ष याबाबतची मागणी करत होते. मात्र कोरोना साथीचा धोका असल्याने निर्णय घेण्याबाबत राज्य सरकार साशंक होतं. पण गणेशोत्सव हा मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी सगळ्यात मोठा उत्सव असल्याने त्यांची नाराजी पत्करणं सरकारला शक्य नव्हतं. त्यामुळे राज्य सरकारने नियम आणि अटी घालत ही परवानगी दिली आहे.
मुंबई पोलिसांवर बोट ठेवणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले
दरवर्षी मुंबईतून हजारो चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. मात्र यावेळी कोरोनाचा उद्रेक असल्याने जास्त सतर्कता बाळगण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.