राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'बुरे दिन', 30 टक्के पदांवर कुऱ्हाड !

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'बुरे दिन', 30 टक्के पदांवर कुऱ्हाड !

जास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.

  • Share this:

02 डिसेंबर : एकीकडे सातव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचारी सुखावले आहे. मात्र, आता काही शासकीय कर्मचाऱ्यांचे बुरे दिन येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने 30 टक्के पदं कमी करण्याचा निर्णय घेतलाय.

सातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसंच संगणकीकरण आणि आउटसोर्सिंगमुळे जास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.

त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची साडेपाच ते सहा लाख पदं कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.  सर्व विभागांमध्ये यामुळे कमालीची अस्वस्थता आहे.

संगणकीकरणाच्या अधिक वापरामुळे मनुष्यबळाची कमी झालेली आवश्यकता, अनेक कामांचे गेल्या काही वर्षांत झालेले कंत्राटीकरण आणि आउटसोर्सिंग यामुळे शासकीय सेवेतील पदांची संख्या कमी करणे गरजेचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

पण आता यावर कर्मचारी संघटनांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.

First published: December 2, 2017, 5:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading