मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी या 10 योजना सुरू करा, उदयनराजेंची सरकारकडे मागणी

आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी या 10 योजना सुरू करा, उदयनराजेंची सरकारकडे मागणी

उदयनराजेंनी मराठा समाजासाठी विविध योजना लागू करण्याची मागणी केली आहे.

उदयनराजेंनी मराठा समाजासाठी विविध योजना लागू करण्याची मागणी केली आहे.

उदयनराजेंनी मराठा समाजासाठी विविध योजना लागू करण्याची मागणी केली आहे.

पुणे, 12 सप्टेंबर : 'मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, विशेषत: ज्या दुर्गम भागातील मुलांना इतर समाजाप्रमाणे हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच नामांकित शाळांमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा,' अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी राज्यातील ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता उदयनराजेंनी मराठा समाजासाठी विविध योजना लागू करण्याची मागणी केली आहे.

उदयनराजेंनी केल्या या 10 मागण्या...

1. प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावी.

2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या मराठा विद्यार्थ्यानां ‘स्वयं’ योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू करा.

3.गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांत प्रवेश मिळावा.

4. ग्रामीण भागातील बेघर मराठा कुटुंबांना घरे मिळावीत.

5.सारथी संस्था सक्षम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1000 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा.

6. बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी सवलती सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्या.

7. मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसह इतर परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू कराव्या.

8.मराठा समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षणाची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात सुविधा उपलब्ध करून द्यावी.

9.ग्रामीण भागातील शेतकऱ्यानां शेतीपूरक व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना लागू करावी. शेती आणि शेतकरी कुटूंबास विमा संरक्षण द्यावे.

10. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा.

दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलून ठोस कृती करावी. अन्यथा मराठा सामाजाच्या रोषाला सामोरे जावे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत वरील मागण्यांसह इतर समाजाप्रमाणे मराठ्यांसाठी बिनव्याजी कर्जाच्या योजना सुरू करून त्यानां छोट्या उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बेरोजगार तरूण-तरूणीनां भत्ता सुरू करावा, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Maratha reservation, Udayan raje bhosle