छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा अवमान,आणखी एका कॉमेडीयनचा व्हिडिओ आला समोर

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा अवमान,आणखी एका कॉमेडीयनचा व्हिडिओ आला समोर

आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी भाषेत विनोद करणाऱ्या अग्रिमा जोशुआने माफीनामा सादर केला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी स्टँड अप कॉमेडीयनचा संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. या कॉमेडीबहाद्दुराने शिवरायांचा अवमान केल्यामुळे शिवभक्त पुन्हा एकदा भडकले आहे.

मुंबईतील खार येथील स्टँडअप कॉमेडी स्टुडिओमध्ये जे हास्य कलाकार कला सादर करत आहेत त्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राच्या अराध्य दैवताचा अवमान केला जात असल्याचं समोर आलं आहे. आता हास्य कलाकर सौरव घोष याचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून विनोद करण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाउनबाबत प्रशासनाचा नवीन निर्णय

सौरभ घोष म्हणतो की, ' मुंबई दोन विमानतळ आहे. आणि  प्रत्येक विमानतळाला शिवाजी महाराज यांचे नाव का दिले जात आहे. एका विमानतळाचे नाव शिवाजी असते आणि दुसऱ्या विमानतळाचे नाव हे नेपोलिएयन असतं तर कुणी मित्राचे लग्न थोडी मिस केले असते. एकाचे नाव शिवाजी किंवा दुसऱ्याचे नाव नॉड शिवाजी असते तर काही फरक पडला नसता. शिवाजी महाराज हे योद्धे होते ते काही पर्यटन करण्यासाठी नव्हते. विमानतळाचे नाव एकसारखी ठेवल्यामुळे विमानाचा पायलट सुद्धा चक्रावून जात असतील की नेमकं कोणत्या विमानतळावर लँड व्हायचं आहे.'

सौरभ घोषचा हा व्हिडिओ 2017 चा आहे. त्याने स्वत: हा व्हिडिओ त्याच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारे कोणीही कलाकार जर छत्रपतींचा अवमान करत असेल तर महाराष्ट्रातील शिवभक्तं हे सहन करणार नाहीत', असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

तसंच, स्टँडअप कॉमेडीचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओमुळे हा शो कायमचा बंद करावा अशी मागणी शिवभक्तांकडून केली जात आहे.

पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या

दोनच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या  स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या मनसेचे कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी घुसून स्टुडिओची तोडफोड केली.

मनसेचे कार्यकर्ते यश रानडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्टुडिओवर धडक दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्टुडिओची तोडफोड केली.  आयोजकांनी मनसे कार्यकर्त्यांकडे माफी मागितली. तसंच अग्रिमा जोशुआने लेखी माफीनामाही लिहून दिला.

पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या

दुसरीकडे अग्रिमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ट्वीट करून तिने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसंच अग्रिमाने तिच्या कॉमेडीचा वादग्रस्त व्हिडिओ सुद्धा डिलीट केला आहे.

Published by: sachin Salve
First published: July 11, 2020, 4:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या