छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना कॉमेडियनचा तोल सुटला, नेटिझन्स संतापले

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना कॉमेडियनचा तोल सुटला, नेटिझन्स संतापले

अग्रिमाने केलेल्या वक्तव्याचा हा व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. अनेक नेटिझन्सनी तिच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिने थट्टा केल्यामुळे सोशल मीडियावर संतापाची तीव्र लाट उमटली आहे. अग्रिमाने मुंबईतील अरबी समुद्रात शिवरायाचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे, यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, अग्रिमा जोशुआने सादर केलेल्या विनोदात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे नेटीझन्सनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

अग्रिमा जोशुआ म्हणाली की, ' अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाी मी इंटरनेटच्या सर्च केले असता काही आढळले नाही. पण कुणीतरी एक निबंध लिहिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टरस्ट्रोक आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल. दुसऱ्या एका जणाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे आणि त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवली जाईल. त्यानंतर मला तिसरा व्यक्ती सापडला ज्याने  शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा असं सांगितलं, बस्स मग मी त्यालाच फॉलो केलं.'

अग्रिमाचा हा व्हिडिओ मागील वर्षीचा आहे. तिने तिच्या युटूब चॅनेलवर 5 एप्रिल रोजी अपलोड केला होता. परंतु, यातला एक मिनिटांचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. अग्रिमाने केलेल्या वक्तव्याचा हा व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. अनेक नेटिझन्सनी तिच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

विकास दुबेचं एन्काउंटर फेक की खरं? प्रदीप शर्मांनी केला अनुभवानुसार खुलासा

युवासेनेतून बाहेर पडलेल्या रमेश सोलंकी यांनी अग्रिमा जोशुआच्या वक्तव्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या असून कडक कारवाई करावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांकडे केली आहे.

Published by: sachin Salve
First published: July 10, 2020, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या