मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ST Strike: 'लढ्याचा पहिला टप्पा आम्ही जिंकलो, आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतो, आता पुढील निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यावा' : सदाभाऊ खोत

ST Strike: 'लढ्याचा पहिला टप्पा आम्ही जिंकलो, आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतो, आता पुढील निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यावा' : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot and Gopichand Padalkar on ST strike: आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहोत असं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे.

Sadabhau Khot and Gopichand Padalkar on ST strike: आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहोत असं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे.

Sadabhau Khot and Gopichand Padalkar on ST strike: आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहोत असं सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 25 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees) पगारात वाढ करण्याचं राज्य सरकारने बुधवारी (24 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. मात्र, एसटी कामगार हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यातच आज एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आझाद मैदानातील आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित कर असल्यांचं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं.

सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मी आणि गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला. आपल्या मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. तुटपुंज्या पगारात एसटी कामगारांचे भागत नाही. अखेर कामगारांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आणि आम्ही ही त्या गामगारांच्या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला. अखेर 16 दिवसांनंतर सरकारला जाग आली.

वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी उभ केलं होतं आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की पुढे किती दिवस आंदोलन सुरू ठेवायचं. आझाद मैदानातील आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. राज्यातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन सुरू असलेलं आंदोलन सुरू टेवायचं की नाही हा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यावा आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत असं सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

ज्या कामगारांना पगार 17 हजार मिळत होता आता त्यांना 24 हजार मिळत आहे. काल राज्य सरकारने जाहीर केलेली वेतनवाढ ही एसटी संपकऱ्यांच्या लढ्याचं मोठं यश आहे. कामगारांचा पहिल्या टप्प्यातील हा विजय आहे. पहिला टप्पा आम्ही जिंकला आहे. विलिगीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

वाचा : एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टरला पगाराबरोबरच Incentive मिळणार

सर्व कामगारांचे निलंबन करण्यात आलं होतं त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. ज्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेताल होता त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णयही मागे घेतला आहे. कामगारांच्या लढ्याला जनतेची मोठी सहानुभूती मिळाली होती.

या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं, महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी अभिनंदन करतो, आतापर्यंत पहिल्यांदा संघटना बाजूला ठेवून आंदोलन केले. सरकार हेकेखोर पणा बाजूला ठेवून निर्णय घ्यावा लागला. आम्ही दोन्ही बाजूंचा विचार केला. सरकार दोन पावल पुढे आले आहे. विलिनीकरण भूमिका आज आमची आहे, पण आता मार्ग काढला पाहिजे. कोर्टात विलिनीकरण मुद्दा प्रलंबित आहे म्हणून सारासार विचार केला. सरकारला नमते घ्यावे लागले. कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही असे वचन सरकार ने दिले. आमचा करेमचाऱ्यावर दबाव नाही. ते आम्हाला बांधील नाहीत.

First published:

Tags: St bus, Strike