• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • ST Employees Strike: अनिल परबांसोबत एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक, संप मागे घेण्याची शक्यता

ST Employees Strike: अनिल परबांसोबत एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक, संप मागे घेण्याची शक्यता

Anil Parab meeting with ST workers leaders: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि अनिल परब यांच्यात बैठक होत आहे.

  • Share this:
मुंबई, 13 नोव्हेंबर : राज्यात राज्य परिवहन (Maharashtra State Transport) अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर (ST employees strike) आता तोडगा निघण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसची कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक होत आहे. या बैठकीत मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी तयार केलेल्या नवीन सुधारीत प्रस्तावावर थोड्याच वेळात त्यांच्या उपस्थितीत ST कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, भाजप नेते सदाभाऊ खोत, गोपिचंद पडवळ यांच्यासह सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचवलेल्या पर्यायासह नवीन सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात आलाय. त्यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. हा प्रस्ताव ST कर्मचारी संघटनांनी स्विकारला तर एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप तात्काळ संपेल अशी शक्यता निर्माण झालीय. अनिल परब - शरद पवारांमध्ये चर्चा परीवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे 10 मिनटे चर्चा झाली. या बैठकीत ST कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. या प्रकरणात समन्वयाने सुवर्णमध्य काढत संप कसा मिटवता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. ST कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन मंत्रालय आज तयार करत आहे. हा प्रस्ताव आजच तयार करून संपकरी कर्मचारी संघटनांना दिला जाणार आणि त्यावर समाधानकारक तोडगा काढला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेत संप मिटवण्यासाठी निर्णायक चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. काल राज ठाकरेंनी घेतली होती पवारांची भेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी (12 नोव्हेंबर 2021) भेट घेतली. लवकरच, शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackery)हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एकत्र भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईसह इतर नेते सोबत होते. या बैठकीनंतर नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली. 'एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार साहेबांच्या कानावर घातले. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्याची मागणी केली. केवळ एसटी प्रश्नावर चर्चा केली. ते तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच, मुख्यमंत्री यांची सर्जरी झाल्यानं राज ठाकरे शरद पवारांना भेटले. फायनान्सचा विषय असल्यानं पवारांना भेटलो. ते मार्ग काढतील असं वाटतंय. राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली.
Published by:Sunil Desale
First published: