• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • ST employees Strike: अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट, बैठकीत काय ठरलं? वाचा INSIDE STORY

ST employees Strike: अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट, बैठकीत काय ठरलं? वाचा INSIDE STORY

ST employees Strike: अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट, मोठा निर्णय होणार?

ST employees Strike: अनिल परबांनी घेतली शरद पवारांची भेट, मोठा निर्णय होणार?

Anil Parab meet Sharad Pawar: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे.

  • Share this:
मुंबई, 13 नोव्हेंबर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST employees strike) अद्यापही तोडगा निघालेला नाहीये. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेण्यास एसटी कर्मचारी तयार नाहीयेत. याच दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. (Transport Minister Anil Parab meets Sharad Pawar over ST employees strike) बैठकीत काय घडलं? परीवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे 10 मिनटे चर्चा झाली. या बैठकीत ST कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. या प्रकरणात समन्वयाने सुवर्णमध्य काढत संप कसा मिटवता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. ST कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सूचवले आहेत. या पर्यांयांचा एक सुधारीत प्रस्ताव परिवहन मंत्रालय आज तयार करत आहे. हा प्रस्ताव आजच तयार करून संपकरी कर्मचारी संघटनांना दिला जाणार आणि त्यावर समाधान कारक तोडगा काढला जाणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेत संप मिटवण्यासाठी निर्णायक चर्चा झाल्याची माहीती मिळतेय. वाचा : राज ठाकरे शरद पवारांसोबत घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, मोठा निर्णय होणार! काल राज ठाकरेंनी घेतली होती पवारांची भेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी (12 नोव्हेंबर 2021) भेट घेतली. लवकरच, शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे (Raj Thackery)हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एकत्र भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईसह इतर नेते सोबत होते. या बैठकीनंतर नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली. 'एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शरद पवार साहेबांच्या कानावर घातले. इतर महामंडळांप्रमाणे सातवा वेतन एसटी महामंडळाला लागू करण्याची मागणी केली. केवळ एसटी प्रश्नावर चर्चा केली. ते तोडगा काढतील अशी अपेक्षा आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच, मुख्यमंत्री यांची सर्जरी झाल्यानं राज ठाकरे शरद पवारांना भेटले. फायनान्सचा विषय असल्यानं पवारांना भेटलो. ते मार्ग काढतील असं वाटतंय. राज ठाकरे व शरद पवार दोघेही मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात भेटतील, अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली.
Published by:Sunil Desale
First published: