मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ST Strike: "संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना 3 दिवसांचा शेवटचा अल्टिमेटम, सेवेत दाखल व्हा अन्यथा..."

ST Strike: "संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना 3 दिवसांचा शेवटचा अल्टिमेटम, सेवेत दाखल व्हा अन्यथा..."

Last ultimatum for strikers ST employees : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आता शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत कर्मचाऱ्यांना सेवेत दाखल होण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई, 10 डिसेंबर : राज्य परिवहन महामंडळाचे (ST Mahamandal) राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST Employees Strike) पुकारला. यावर तोडगा काढत राज्य सरकारने पगारवाढ जाहीर केली. पगारवाढ जाहीर केल्यानंतर काही कर्मचारी सेवेत दाखल झाले मात्र, अद्यापही काही कर्मचारी आपली विलिनीकरणाची मागणी कायम लावून धरत संपावर आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांना आता राज्य सरकारकडून शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पत्रकार परिषद घेत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अखेरचा 3 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. (Anil Parab gives last 3 days ultimatum to striker st employees)

शेवटचा अल्टिमेटम

अनिल परब यांनी एसटी मडामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज महत्तवाची चर्चा केली. या चर्चेनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत संपकरी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. अनिल परब म्हणाले, संपकरी ST कामगारांना पुढील ३ दिवसांचा शेवटचा अल्टिमेटम. सेवेत दाखल व्हा नाहीतर कडक कारवाईला प्रत्यक्षात सुरवात होईल. सोमवारपर्यंत न आल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, यात बडतर्फ करण्याचीही कारवाई असेल.

वाचा : लालपरी पुन्हा धावू लागली, 19 हजार कर्मचारी कामावर परतले!

'त्यांचे' निलंबन मागे घेणार

जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेवू. एक संधी देत आहोत आम्ही. सर्वच कामगारांनी कामावर यावे. कामावर जाताना अडवल्यास पोलिसांत तक्रार करू. सोमवारपर्यंत जे कर्मचारी सेवेत येतील त्यांचे निलंबन मागे घेण्यात येईल, तशी मूभा त्यांना दिली आहे.

संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणार?

संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. यावर अनिल परब म्हणाले, सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेवू. एक संधी देत आहोत. मेस्माची कारवाई सोमवारपर्यंत तरी होणार नाही.

विलिनीकरणाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती 20 डिसेंबरला तारखेला प्राथमिक अहवाल सादर करेल. परंतु 12 आठवड्यांनीच अंतिम अहवाल देईल. समितीचा निर्णय होईपर्यंत कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. जे कामगार कामावर आलेत त्यांना नविन वेतनवाढ दिली आहे.

संपामुळे 550 कोटींचं नुकसान

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आतापर्यंत एसटीचे 550 कोटींचे नुकसान झाले आहे. 10 हजार कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत निलंबन झालं आहे. सरसकट कामगारांची चुकी नाही. भडकवणारे उद्या निघून जातील, पण कर्मचारी पगाराविना राहतील असंही अनिल परब म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या लक्षात येवू लागलंय की विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. कर्मचाऱ्यांचे विविध गट भेटतायत. प्रत्येक आत्महत्तेला एसटी संपासोबत जोडलं जातंय. कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे पण काही जण त्यांना अडवत आहेत असंही अनिल परब म्हणाले.

First published:

Tags: Anil parab, St bus, Strike