Home /News /mumbai /

पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्त्यांच्या मागे कोण? संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल

पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्त्यांच्या मागे कोण? संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल

पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्त्यांच्या मागे कोण? राऊतांचा सवाल

पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, आंदोलनकर्त्यांच्या मागे कोण? राऊतांचा सवाल

ST Employees protest outside NCP chief sharad pawar house: एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली आहे.

    मुंबई, 8 एप्रिल : एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन (ST employees protest outside Sharad Pawar house) केलं. एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या सिल्वर ओक घराबाहेर अचानकपणे आंदोलन केलं. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली आहे. या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली तसेच इतक्या मोठ्या राजकीय नेत्याच्या मुंबईतील घराबाहेर अशा प्रकारे आंदोलन होणं म्हणजे पोलीस, गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याचं बोललं जात आहे. या आंदोलनावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले, अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी असा हा प्रकार आहे. एसटी संपाच्या बाबतीत सरकरारने मागण्या मागण्या करण्यासाठी, मागण्या मान्य करण्यासाठी सर्व उपाययोजना आणि चर्चा केल्या. न्यायालयाचा निर्णय आहे तो सुद्धा त्याच पद्धतीचा आहे. बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे पण तरीही कुठली तरी एक अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवण्याचा आणि एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन माथी भडकवून अशा प्रकारचे कृत्य घडावे यासाठी सातत्याने हालचाली करत आहेत. वाचा : शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय संजय राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार त्यांच्या डोळ्यात खूपत आहे. ज्यामुळे ज्यांच्या पोटात दुखत आहे असे काही लोक जी कृत्य घडवू पाहत आहेत. शरद पवार हे संसदीय लोकशाही मानणारे नेते आहेत. आंदोलने, निदर्शने, मोर्चे हा जनतेचा हक्का आहे असे मानणाऱ्या नेत्यांपैकी ते एक आहेत. ज्या पद्धतीचं आंदोलन मी पाहिलं, ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी गेल्या आणि आंदोलकांना हात जोडून विनंती करत होत्या, चर्चा करत होत्या. पण तरीही समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन सुरू होतं... हे लोकशाहीच्या कुठल्याही आंदोलनाला शोभणारे नाहीये. यांचे नेते कोण आहेत हे पहावं लागेल. आम्ही सुद्धा आंदोलने केली आहेत. लाखोंच्या संख्येत आंदोलन केली आहेत संघर्ष केला आहे. सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती एसटी कर्मचाऱ्यांच्या या आदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी आंदोलक कर्मचाऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, शांतेत चर्चा करुयात असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी वारंवार केले. मात्र, त्यांच्या आवाहनाला आंदोलकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर हताश झालेल्या सुप्रिया सुळे पुन्हा घरात परतल्या.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai, Sharad Pawar (Politician), St bus

    पुढील बातम्या