Home /News /mumbai /

पगारवाढीच्या घोषणेनंतरही ST कर्मचाऱ्यांचा राग अनावर; अनिल परब नेमकं काय म्हणाले?

पगारवाढीच्या घोषणेनंतरही ST कर्मचाऱ्यांचा राग अनावर; अनिल परब नेमकं काय म्हणाले?

नेमकं काय म्हणाले अनिल परब?

    मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST Employee) पगारवाढीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी राज्य सरकारत विलिनीकरणाची मागणी करीत आहेत. मात्र राज्य सरकारने विलीनकरणावर निर्णय न घेता पगारवाढीचा (ST Employee Salary increase) पर्याय पुढे करून दिला. असं असलं तरी कर्मचाऱ्यांनी याबाबत संतप्त भूमिका घेतली. पुणे, मुंबईत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या निर्णयावर राग व्यक्त केला. आणि विलीनकरण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. दरम्यान अनिल परब यांनी आपल्या पत्रकार परिषदेत काय निर्णय़ घेतला याबद्दल जाणून घ्या.. हे ही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी पगारवाढीचा प्रस्ताव 1. जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. 2. गेले 15 दिवस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू होता. या संपात कर्मचाऱ्यांची एकच प्रमुख मागणी होती, ती म्हणजे महामंळाच्या कर्मचाऱ्यांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं. याबाबत आम्ही आमची भूमिका वेगवेगळ्या स्तरावर मांडत होतो. 3. उच्च न्यायालयात ज्यावेळी विषय गेला त्यावेळी उच्च न्यायालयाने त्रिस्तरस्तीय समिती बनवली आहे. या समितीला 12 आठवड्यात विलीनीकरणाबाबत अहवाल मु्ख्यमंत्र्यांकडे द्यावा. नंतर मुख्यमंत्र्यांचे म्हणणं त्याला जोडून मग तो अहवाल हायकोर्टात अहवाल जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाची मागणी हायकोर्टाच्या समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. समितीच्या अहवालात जे काही असेल तो निर्णय आम्ही घेऊ. 4. ४१% वाढ ही एसटीच्या इतिहासात सगळ्यात मोठी वाढ. 5. हा संप दिवसेंदिवस लांबत चालला होता. समितीचा अहवाल यायला बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत काय करावं याबाबत आम्ही विचार करत होतो. आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचं काम केलं. 6. कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विचार करत हा निर्णय सरकारने घेतला आहे बाकी राज्यांच्या तुलनेत त्यांना वेतनात योग्य वाढ करण्यात आली आहे. 7. एसटी कोरोनामुळे २ वर्षे तोट्यात होती २७०० कोटी रूपये राज्यसरकारने दिले होते कामगारांवर कर्ज झाले आत्महत्या करावी लागली, हे दुर्देवी. कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेच्या आत होणार ही ग्वाही सरकारने दिली आहे. 8. निलंबित कामगारांचे हजर झाल्यानंतर कारवाई मागे घेण्यात येणार 9. एसटीवर ६० कोटींचा अतिरिक्त बोजा पगारसाठी देण्यात आला आहे. 10. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली आहे.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Anil parab, Mumbai, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या