सरकारचे एक पाऊल मागे, एसटी कर्मचारी संघटनेला बोलावलं बैठकीला

सरकारचे एक पाऊल मागे, एसटी कर्मचारी संघटनेला बोलावलं बैठकीला

आज मान्यताप्राप्त कामगार संघटना आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • Share this:

18 आॅक्टोबर : एसटी कर्मचारी संपाबाबत राज्य सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतलंय. कर्मचारी आणि सरकारमध्ये फिस्कटलेली चर्चेला आज पुन्हा सुरूवात होणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमुळे ऐेन दिवाळीत एसटी सेवेचे बारा वाजले आहे. सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहे. सातव्या वेतन आयोगाची मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी फेटाळून लावलीये.

मात्र, संप चिघळत चालत असल्यामुळे सरकारने आता माघार घेतलीये. प्रशासनाने एसटी कर्मचाऱ्यासोबत चर्चा करावी अशा सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आज मान्यताप्राप्त कामगार संघटना आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

संपाबाबत IBN लोकमतचे सवाल

एसटी कर्मचारी चांगली सेवा देतात का ?

आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्यावी का ?

ऐन सणासुदीत संप करणाऱ्यांना प्रवाशांचे हाल दिसत नाहीत का ?

सातव्या वेतन आयोगाचा भार एसटी पेलू शकेल का ?

आंदोलनामुळे एसटीचं कंबरडं मोडलं तर जबाबदार कोण ?

 

First published: October 18, 2017, 8:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading