मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण आग, 60 प्रवासी बचावले

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण आग, 60 प्रवासी बचावले

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला भीषण आग लागली. बसमध्ये 60 प्रवासी होते. ते थोडक्यात बचावले.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला भीषण आग लागली. बसमध्ये 60 प्रवासी होते. ते थोडक्यात बचावले. मात्र, बस पूर्णपणे जळून राख झाली आहे. गणपतीसाठीची सोडण्यात आलेली ही जादा बस आहे.

परळहून (मुंबई) चिपळूणला निघाली होती. बस वडपाले गावाच्या हद्दीत आली असती तिने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना सुखरुप खाली उतरवले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी  महाड नगरपरिषदेचे अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची 2-3 किमीपर्यंत रांग लागली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2019 08:40 AM IST

ताज्या बातम्या