मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ST Bus Strike : लालपरी पुन्हा धावू लागली, 19 हजार कर्मचारी कामावर परतले!

ST Bus Strike : लालपरी पुन्हा धावू लागली, 19 हजार कर्मचारी कामावर परतले!

 विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

अनिल परब (anil parab) यांनी आवाहन केल्यानंतर 19 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. त्यामुळे 250 पैकी 105 आगार सुरू झाले आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 06 डिसेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिगीकरण करुन घेण्यासाठी मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर (st bus strike) ठाम आहे. पण, आता या संपात फूट पडल्याचे चित्र आहे. परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी आवाहन केल्यानंतर 19 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहे. त्यामुळे 250 पैकी 105 आगार सुरू झाले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच कॉलेज व शाळकरी विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याबाबत केलेल्या आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.

सोमवारी राज्यभरातील विविध आगारात सुमारे १९ हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी २५० आगारांपैकी १०५ आगारातून वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान, रविवारी ७३४ बसेसद्वारे सुमारे १७०३ फेऱ्यांच्या माध्यमातून १ लाख ०४ हजार ८०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीतून महामंडळाच्या तिजोरीत ७६ लाख ३० हजार रूपयांची भर पडली आहे.

पिझ्झा गोल असतो, मग तो चौकोनी बॉक्समध्ये का दिला जातो बरं?

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ संप सुरू आहे. यासंदर्भात अनिल परब यांनी शुक्रवारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यभरातील आगारातील गाड्यांचा तसंच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना  महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनता एसटीची आतुरतेने वाट पाहत आहे. शाळा महाविद्यालयात जाणारे लाखो विद्यार्थी  - विद्यार्थिनी, जेष्ठ नागरिक, कामावर जाणारे शेतकरी, शेतमजूर अशा अनेक गोरगरीब प्रवाशी जनतेची एसटीअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी संपकरी कामगारांनी कामावर यावे, असे आवाहन परब यांनी केले होते.

'ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचे आहे, परंतु त्यांची कोणी अडवणूक करत असेल अशा लोकांवर कठोर कारवाई करणार असा इशारा देत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले होते.

परब यांच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जे कर्मचारी कामावर रूजू होत आहेत, त्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. रविवारी अनेक कर्मचारी कामावर परतले. तर सोमवारी या संख्येत वाढ होऊन उपस्थितांची संख्या १९ हजारांपर्यंत पोहोचली. शनिवार, ३ डिसेंबर रोजी अवघी ४९ आगारे सुरू होती. अवघ्या तीन दिवसानंतर ५६ आगारांची भर पडून सोमवारी राज्यभरातील १०५ आगारे सुरू झाली आहेत. राज्यभरात संपाच्या पार्श्वभूमीवर आगारातून एसटी वाहतूक करताना आतापर्यंत ४० हून अधिक बसेस फोडण्यात आल्या आहेत. एसटीच्या आवारात बसेस अडवणे, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, गेट बंद करणे आदी घटनांवरून ९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

छोट्याशा पक्ष्यासमोर भलामोठा बिबट्याही फेल; कधीच पाहिला नसेल असा शिकारीचा VIDEO

दरम्यान, लातूर आगारातून बाहेर पडणाऱ्या एसटीला प्रतिबंध करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे. वाहतुकीला विरोध करणाऱ्या १४ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर धारूर येथेही संपकरी कर्मचाऱ्यांनी आगारातून बाहेर पडणारी बस अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे आगारातून बस वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महामंडळ प्रशासनाच्यावतीने संरक्षण दिले जात आहे.

First published: