मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ST BUS Strike : ST महामंडळाची 2296 कर्मचाऱ्यांना काम समाप्तीची नोटीस, 24 तासांचा अल्टीमेटम!

ST BUS Strike : ST महामंडळाची 2296 कर्मचाऱ्यांना काम समाप्तीची नोटीस, 24 तासांचा अल्टीमेटम!

 विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

विलीनीकरणाच आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यात हा तिसरा बळी गेला.

कामावर हजर व्हा नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल, असे प्रशासनानं नोटीसीद्वारे कळवले आहे.

मुंबई, 17 नोव्हेंबर : एसटी महामंडळ (Maharashtra State Transport)  राज्य सरकारमध्ये विलगीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आपल्या संपावर (ST employees strike)ठाम आहे. हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरूच आहे. अशातच एसटी महामंडळाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच वेळी 2296 रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याची विनंती केली होती. पण, एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. त्यामुळे आता महामंडळाने कारवाईला सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाने संपाविरोधात मोठं पाऊल उचलले आहे. एकाच वेळी २२९६ रोजंदार कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कर्मचाऱ्यांना 24 तासांचे अल्टीमेटम दिले आहे. कामावर हजर व्हा नाही तर सेवा समाप्त करण्यात येईल, असे प्रशासनानं नोटीसीद्वारे कळवले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

IND vs NZ 1st T20 : पाऊस खेळ खराब करणार? पाहा जयपूरचा Weather Report

तर दुसरीकडे, मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत हजर राहण्याचे वारंवार आवाहन केलं मात्र, संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यातच एसटी महामंडळाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. याच निलंबनाच्या कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील एका संपकरी कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं!

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात संपावर असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठलाच तोडगा निघत नाहीये. त्यातच सरकार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहे. त्यामुळे आपलेही निलंबन होईल या भीतीने खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू

तर, उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथील एका 32 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे.  निलंबनाच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे. किरण घोडके असं या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. किरण हे अक्कलकोट आगारात चालक या पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. राज्यसरकारने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाया सुरू केल्या आहेत. आपल्या इतर सहकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे किरण घोडके हे देखील अस्वस्थ झाले होते. काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. निलंबनाची कारवाई होईल या भीतीने ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

First published: