मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून आता वेगवेगळी चित्र पाहण्यास मिळत आहे. काही कर्मचारी हे कामावर परतले आहे तर काही कर्मचारी हे अजून कामावर जाण्यास तयार नाही. अशातच एसटी कर्मचारी कृती समितीच्या ( ST workers Committee) शिष्टमंडळाने परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. यावेळी, कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, निलंबनाची कारवाई आज केली जाणार नाही. यासाठी एक दिवसांची वाढ केली आहे, अशी घोषणा परब यांनी केली.
आज मुंबई सेंट्रल मुख्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासोबत एसटी कृती समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री, महामंडळ एमडीसह कृती समितीचे 28 सदस्य उपस्थितीत होते. या बैठकीनंतर परब यांनी कर्मचाऱ्यांचे निलंबन आज निलंबन केले जाणार नाही,यासाठी कामाची एकदिवस मुदत वाढवून देण्यात आली आहे.
'उद्या कामावर येणाऱ्या कामगारांवर कारवाई होणार नाही. आम्ही कोणत्याही मागणीला नाही म्हटलं नाही, संप मिटल्यावर आर्थिक अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये. संप सुरू राहिला तर कर्मचारी आणि प्रवासी यांना हानिकारक आहे. 500 रोजंदारी कामगारांची सेवा आज समाप्त केली आहे, अशी माहिती परब यांनी दिली.
Destination Wedding मध्ये घुसून 2 कोटींची चोरी, पाहुणा बनून आला चोर
'कर्मचारी संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. अधिक सुधारित वेतनश्रेणीची त्यांनी मागणी केली. संप मिटल्यावर यावर चर्चा करून निर्णय घेणार आहोत. कर्मचाऱ्यांवर अन्याय करणार नाही. जाचक अटी रद्द करता येईल का ? याबाबत निर्णय घेणार आहे. राज्य सरकारने नियमित पगार देण्याची हमी घेतली आहे, असंही परब यांनी सांगितलं.
7वा वेतन आयोग मागणी त्यांनी केली, यावर विचार करणार आहे. विलीनीकरण मुद्दा सरकारच्या हातात नाही तो निर्णय आल्यावर विचार करता येईल. तोपर्यंत एसटी बंद राहणं म्हणजे सहन न करता येणारं आर्थिक नुकसान आहे. सतत आर्थिक भार स्वीकारणं शक्य नाही. त्यामुळे कामगारांनी त्वरित संप मागे घ्यावा, कामगारांचे हक्क अबाधीत ठेवणार आहोत. कर्मचारी संघटना चर्चेत सकारात्मक आहोत. कामावर येण्यास कामगार इच्छुक आहेत त्यामुळे अजून 1 दिवस निलंबन न करण्याचा निर्णय नाही, असंही परब यांनी जाहीर केलं.
कर्मचारी कृती समितीचेही कामगारांना आवाहन
'विलीनीकरण मागणी आमची कायम आहे. मात्र दिलेली वेतनश्रेणी अमान्य आहे. यात सुधारणा करावी ही आमची मंत्र्यांकडे मागणी केली. एसटी पुन्हा सुरळीत सुरू झाल्यावर यावर विचार करू हे त्यांनी आश्वासन दिलं आहे. अवास्तव,अवाजवी दंड आकारणी रद्द करण्याचं मंत्र्यांचं आश्वासन दिले आहे, अशी माहिती एसटी कर्मचारी कृती संघटनेचे संदीप शिंदे यांनी दिली.
Airplane | विमानं निवृत्तीनंतर शेवटचं उड्डाण कुठं घेतात? पुढं त्याचं काय होतं?
कर्माचाऱ्यांची आम्हाला काळजी आहे. राज्य सरकारनं वाहतूक सुरू करावी ही मागणी आम्हाला मान्य आहे. आमची कर्मचाऱ्यांना विनंती कामावर या, असं आवाहनही समितीने केलं आहे
तसंच, 'कर्मचारी आडमुठे नाही. विलीनीकरण झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही सांगणाऱ्या नेत्यांनी त्याआधीच मैदान सोडलं. काही राजकीय लोकांमुळे आंदोलन भरकटत गेलं. मैदान सोडणाऱ्या नेत्यांना आमच्या कर्मचाऱ्यांची दया नाही आली, असं म्हणत शिंदे यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.