• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • St Bus Strike : रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांचा आदेश, उदय सामंत यांच्या बंगल्यावर पडळकर-खोत पोहोचले

St Bus Strike : रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांचा आदेश, उदय सामंत यांच्या बंगल्यावर पडळकर-खोत पोहोचले

उदय सामंत यांच्या B2 बंगल्यावर भाजप आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar)  आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची बैठक सुरू आहे.

उदय सामंत यांच्या B2 बंगल्यावर भाजप आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची बैठक सुरू आहे.

उदय सामंत यांच्या B2 बंगल्यावर भाजप आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची बैठक सुरू आहे.

  • Share this:
    मुंबई, 23 नोव्हेंबर : गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आज परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांसह भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत  यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही नेते उदय सामंत यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. वेतन निश्चिती आणि वेतनवाढ यावर मसुदा तयार करण्याबाबत चर्चा होत आहे. विशेष म्हणजे,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदय सामंत यांना सूचना असल्याची माहिती आहे. बंद दाराआड बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे, ST कर्मचाऱ्यांचा संप सन्मानाने मिटवण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची निर्णायक भूमिका बजावत आहे. उदय सामंत यांनी ST कर्मचाऱ्यांना सन्माजनक प्रस्ताव देऊन संप मिटवण्यासाठी सकारात्मक चर्चा घडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. आतापर्यंत उदय सामंत पडद्यामागून सकारात्माक जबाबदारी पार पाडत होते. आज पहिल्यांदाच संपकरी कर्मचारी आणि भाजपचे पडळकर आणि खोत यांनी सकारात्मक भूमिका जाहीर केली. पडळकरांनी घेतली नरमाईची भूमिका दरम्यान, एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर  परिवहन मंत्री अनिल परब आणि सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलता असताना पडळकर यांनी माहिती दिली. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे पण आम्ही विलीनीकरण मुद्द्यावर आम्ही ठाम आहे. हायकोर्ट निर्णयाचा त्यांनी हवाला दिला आहे. तोपर्यंत त्यांनी 2 पर्याय दिले आहे.  पगारवाढ आणि वेळेवर पगार यावर चर्चा झाली. याबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.  यावर आम्ही कर्मचाऱ्यांशी रात्री बोलणार आहोत, असं पडळकर यांनी सांगितलं. उद्या पुन्हा बैठक होणार आहे. कोर्ट प्रक्रियेमुळे विलीनीकरण मुद्द्याला वेळ लागणार आहे.  सरकारने आज पहिल्यांदा प्रस्ताव दिला. विलीनीकरण होत नाही तोपर्यंत पगारवाढ, पगार निश्चिती देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, असं पडळकर म्हणाले. तर, आजच्या बैठकीत विलीनीकरण मुद्द्यावर चर्चा झाली. उद्याच्या बैठकीत कर्मचारी निलंबन मुद्दा घेणार आहोता.  सरकारनं सहकार्याची भूमिका पहिल्यांदा स्पष्ट केली आहे.   कोर्टानं विलीनीकरण मान्य केलं तर सरकार विलीनीकरण करण्यास तयार आहे, असं मंत्र्यांनी सांगितलं आहे, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली. तसंच, हा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वयंस्फूर्तीने केलेला संप आहे. आम्ही कायम कर्मचाऱ्यांसोबत आहोत.  कर्मचाऱ्यांच्या सर्व अडचणींवर आम्ही चर्चा करणार आहोत.  पाठिंबा देणाऱ्या संघटनांना आवाहन की त्यांनी कायदा मोडू नये, आझाद मैदानावर आमचं अहिंसेच्या मार्गानं आंदोलन सुरू राहिल, असंही खोत यांनी सांगितलं. 'हायकोर्टाच्या आदेशाचं आम्ही उल्लंघन करु शकत नाहीत' दरम्यान, हायकोर्टाने एक समिती बनवली आहे. या समितीसमोर हा विषय आहे. या समितीला 12 आठवड्यांमध्ये आपला अहवाल हा मुख्यमंत्र्यांना द्यायचा आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांमार्फत तो अहवाल हायकोर्टात द्यायचा आहे. हायकोर्टाकडूनच थेट आदेश आले आहेत. त्यामुळे या आदेशाचे उल्लंघन सरकार म्हणून मी आणि कामगार म्हणून ते देखील करु शकत नाहीत", असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
    Published by:sachin Salve
    First published: