एसटी महामंडळाकडून खूशखबर, दुष्काळग्रस्त जिल्ह्यात होणार 4242 पदांसाठी मेगाभरती

एसटी महामंडळाकडून खूशखबर, दुष्काळग्रस्त जिल्ह्यात होणार 4242 पदांसाठी मेगाभरती

4242 पदांसाठी लवकरच महामंडळाच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी एकाच दिवशी संबंधित जिल्ह्यात परीक्षा होणार आहे

  • Share this:

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी

मुंबई, 28 डिसेंबर : "राज्यात दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये तरूण-तरुणींसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 4242 पदांची भरती केली जाणार आहे", अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 4242 पदांसाठी लवकरच महामंडळाच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी एकाच दिवशी संबंधित जिल्ह्यात परीक्षा होणार आहे.

औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यात ही मेगाभरती होणार आहे. परंतु, यापैकी 11 जिल्ह्यात 4242 पदांच्या जागा आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक अथवा वाहक पदांसाठी रिक्त जागा नाहीत. असं असलं तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील तरूणाच्या हातात काम देण्यासाठी या जिल्ह्यातील पात्र, उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा आहे आहेत, तिथे नियुक्यता दिल्या जातील. तसंच ज्यावेळी या दुष्काळग्रस्त चार जिल्ह्यात चालक अथवा वाहक पदाच्या जागा रिक्त होतील, तेव्हा या उमेदवारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल, असं परिवहन महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी

या मेगाभरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एस.टी. महामंडळाने घेतला आहे.

परिक्षा शुल्कात सवलत

ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसंच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परिक्षा शुल्कात 50 टक्कांची सवलत देण्यात येणार आहे.

औरंगाबादेत शहर वाहतूक योजनेत ठोक रक्कम

परिक्षेत उत्तीण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर वाहतूक योजनेतील 560 पदांसाठी 15 हजार रुपयांची ठोक रक्कम आणि वार्षिक 500 रुपयांची वाढ या पद्धतीने 5 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा विकल्पही स्वीकारण्यात येणार आहे.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 06:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading