एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

  • Share this:

मुंबई, 09 जून : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला अघोषित बंद अखेर मागे घेतलाय. परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि कामगार संघटनेत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात. त्यानंतर संघटनेनं संप मागे घेत असल्याची घोषणा केलीये.

गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या विरोधात अघोषित संप पुकारला होता. आज मुंबईत संपाच्या तोडग्यासाठी एसटी कामगार संघटना आणि एसटी सीईओ याच्यांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंसोबत बैठक पार पडली. या बैठकीत तीन वेतनवाढ बाबत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांी  थकबाकी 48 हप्त्यात दिली जाईल. तसंच सातवा वेतन आयोग, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता राज्य सरकार प्रमाणे  देणार असल्याचं मान्य करण्यात आलंय.

त्याचबरोबर राज्य सरकारच्या सातवा वेतन आयोग ज्या प्रमाणे देईल तो एसटीला दिला जाईल. कर्मचाऱ्यांसाठी 4875 कोटींचं जे पॅकेज जाहीर झालंय  ते कामगारांच्या सोयीने त्याच वाटप करण्यात येईल अशी माहिती रावतेंनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विदेशातून चर्चा झाली. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून तातडीने संप मिटवण्यासाठी चर्चा झाली होती अशी माहिती रावतेंनी दिली.

संबंधीत बातम्या

सलग तीन दिवस ड्युटी करुन घरी परतणाऱ्या एसटी चालकाचा मृत्यू

पगारवाढीसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचं मध्यरात्रीपासून कामबंद आंदोलन, प्रवाशांचे हाल

एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के वाढ

दुसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, संपामुळे एसटीचं इतक्या कोटींचं नुकसान

First published: June 9, 2018, 10:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading