Home /News /mumbai /

काळ आला होता, पण... बसचा मोठा अपघात टळला

काळ आला होता, पण... बसचा मोठा अपघात टळला

  मुंबई, ता. 24 जुलै : ठाण्यात आज सकाळी एका एसटी बसला मोठा अपघात होता होता टळलाय. ज्यामुळे अनेक प्रवाशांचे आणि पादचाऱ्यांचे जीव वाचलेत. मंगळवारी सकाळी 6.15 वाजताच्या दरम्यान एसटी महामंडळाची बोरीवली-मंगळवेढा ही बस ठाण्याच्या दिशेने जात असताना वाघबीळजवळील उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्यामुळे सुरक्षा कठडा तुटून बस उड्डाणपुलावरुन खाली पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने बस अधांतरीच राहिल्याना मोठा अनर्थ टळला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय मंगळवारी सकाळी एसटी महामंडळाच्या बोरीवली-मंगळवेढा बसमधील प्रवाशांनी अनुभवला. प्रत्येकाच्या जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना वाघबीळीच्या उड्डाण पुलावर घडली. बोरीवली वरुन निघालेली ही बस पहाटे 6.15 च्या दरम्यान वाघबीळजवळच्या उड्डाण पुलावरुन ठाण्याच्या दिशेने धावत असतांना, पुलाच्या कठड्याला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसच्या ड्रायव्हर साईडने सुरक्षा कडा तोडून बस उड्डाणपुलावरुन खाली कोसळणार अशी स्थिती निर्माण झाली होती. Maratha Morcha Andolan: नांदेडमध्ये पोलिसांनी केला लाठीचार्ज या अपघातात एसटी बसचा कंडक्टर जख्मी झाला असून ३ प्रवाशी किरकोळ जख्मी झालेत आहेत. जर ही बस उड्डाणपुलावरुन खाली कोसळली असती, तर मात्र खालून जाणा-या गाड्यांवर आणि पादचाऱ्यांवर पडली असती व त्यामुळे मोठी प्राणहानी घडली असती. पण दैव बलवत्तर! सुदैवाने हा अपघात टळला. हा अपघात पहाटे-पहाटे घडल्यामुळे तो बस चालकाच्या चुकीमुळे घडला की, आणखी कोणत्या तांत्रीक कारणामुळे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चाैकशीनंतर ते समोर येईल. हेही वाचा... मराठा समाजाच्या आंदोलनात असामाजिक तत्वं, शिवसेनेचा लोकसभेत प्रहार सकल मराठा मोर्च्याकडून उद्या नवी मुंबई बंदची हाक

  मुंबईत भरघाव वेगातल्या जॅग्वारने उडवलं 10 गाड्यांना !

   
  First published:

  Tags: Accident, Borivali, Flyover, Mangalvedha, On waghbil, St bus, Thane, अपघात, उड्डाण पुल, एसटी बस, ठाणे, बोरीवली-मंगळवेढा, वाघबीळ

  पुढील बातम्या