ऐन दिवाळीत एसटीचा संप, प्रवाशांचे प्रचंड हाल

ऐन दिवाळीत एसटीचा संप, प्रवाशांचे प्रचंड हाल

ऐन दिवाळीत एसटीचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेत. त्यामुळे दिवाळीच्या निमित्त गावाकडं जाणाऱ्यांचे रात्रीपासून प्रचंड हाल होतायत. सर्व मोठ्या आगारांमध्ये एसटी बसेस उभ्या आहेत.. सहकुटुंब प्रवास, त्यात दिवाळीचं सामान.. लोकांचे खूप हाल होतायत

  • Share this:

मुंबई/पुणे, 17 ऑक्टोबर : ऐन दिवाळीत एसटीचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेत. त्यामुळे दिवाळीच्या निमित्त गावाकडं जाणाऱ्यांचे रात्रीपासून प्रचंड हाल होतायत. सर्व मोठ्या आगारांमध्ये एसटी बसेस उभ्या आहेत.. सहकुटुंब प्रवास, त्यात दिवाळीचं सामान.. लोकांचे खूप हाल होतायत.. सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. एसटी कर्मचारी संघटनेची काल मुख्यमंत्र्यांशीही चर्चा झाली, पण ती निष्फळ ठरली. लेखी हमी दिल्याशिवाय कामावर जाणार नाही, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मागण्या रास्त आहेत की नाही हा नंतरचा भाग आहे.. पण ऐन सणासुदीच्या दिवसात प्रवाशांना शिक्षा कशासाठी, हा महत्वाचा सवाल आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील जवळपास सर्वच एसटी स्थानकांवरचे प्रवासी संपामुळे गावाकडे जाण्यासाठी आता खासगी वाहनांचा आधार शोधताहेत. पण नेमकीच हीच संधी साधून प्रवाशांची खासगी वाहतूकदारांकडून लूट सुरू आहे. त्यामुऴे राज्यशासनाने त्वरित एसटी संपावर तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून होतेय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 09:46 AM IST

ताज्या बातम्या