SSR Death: ‘मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षडयंत्र’, पोलीस आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

SSR Death: ‘मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षडयंत्र’, पोलीस आयुक्तांनी दिला कारवाईचा इशारा

'अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व अकाउंटसचा तपास सुरू आहे.'

  • Share this:

मुंबई 05 ऑक्टोबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर चौफेर टीका झाली होती. सोशल मीडियावरूनही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. त्या सगळ्यांवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मोठा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं गेलं असून त्याच्या पाठीमागे कोण आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांना बदनाम करण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

सिंग म्हणाले, मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं षड्यंत्र रचलं गेलं. या षडयंत्रामागे कोण आहेत याचा तपास केला जात आहे. आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानी होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

अनेक फेक अकाउंटस तयार केले गेले त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

"सुशांतची हत्या झाली होती"; AIIMS च्या डॉक्टरांची AUDIO CLIP लीक

सुशांत सिंह राजपूत मृत्यू ही आत्महत्याच होती. हत्या नव्हती असा निर्वाळा एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मंडळाने या सर्व प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून आता भाजप आमदाराने शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

कंगनाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण, संजय राऊतांनी दिले उत्तर

घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर ट्वीटकरून निशाणा साधला आहे. सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास वळवून ड्रग्स कनेक्शनवर आणला आणि त्यातही ड्रग्सबाबत मिळालेल्या दुव्याकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? मुंबई पोलिसांना काही बड्या नेत्यांना वाचवायचं होतं का?

बॉलिवूडमधील ड्रग्जचा व्यवसाय वाढतोय याची जबाबदारी सरकारनं घ्यायला हवी. अशा गोष्टी होतात याची सगळ्यात पहिली माहिती ही सरकारला असायला हवी. अशा प्रकारे ट्वीट करून निशाणा साधला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 5, 2020, 3:59 PM IST

ताज्या बातम्या