Home /News /mumbai /

जायचे होते शिर्डीला पोहोचले मुंबईला, स्पाईस जेट विमानाचे मुंबई विमानतळावर लँडिंग

जायचे होते शिर्डीला पोहोचले मुंबईला, स्पाईस जेट विमानाचे मुंबई विमानतळावर लँडिंग

 धक्कादायक म्हणजे, शिर्डीला विमान पोहोचून सुद्धा ते मुंबईकडे वळवण्यात आले होते.या घटनेमुळे प्रवाश्यांचा प्रचंड संताप पाहण्यास मिळाला

धक्कादायक म्हणजे, शिर्डीला विमान पोहोचून सुद्धा ते मुंबईकडे वळवण्यात आले होते.या घटनेमुळे प्रवाश्यांचा प्रचंड संताप पाहण्यास मिळाला

धक्कादायक म्हणजे, शिर्डीला विमान पोहोचून सुद्धा ते मुंबईकडे वळवण्यात आले होते.या घटनेमुळे प्रवाश्यांचा प्रचंड संताप पाहण्यास मिळाला

शिर्डी, १९ मे - दिल्लीहून निघालेले स्पाईस जेटचे विमान (spicejet delhi to shirdi flight) तांत्रिक बिघाडामुळे मुंबईला उतरवण्यात (mumbai airport) आले आहे. धक्कादायक म्हणजे, विमान शिर्डीला पोहोचून सुद्धा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. अचानक झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली विमानतळावरून शिर्डीसाठी स्पाईस जेटचे विमान निघाले होते. दुपारी 2 वाजून 50 मिनिटाने दिल्लीहुन हे विमान निघाले होते. साधारणपणे विमान 4 वाजून 30 मिनिटाला शिर्डी विमान तळावर उतरण अपेक्षित होते. मात्र संध्याकाळी हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. कधी खराब हवामान तर कधी तांत्रिक कारण स्पाईस जेटच्या वतीने देण्यात आले. धक्कादायक म्हणजे, शिर्डीला विमान पोहोचून सुद्धा ते मुंबईकडे वळवण्यात आले होते.या घटनेमुळे प्रवाश्यांचा प्रचंड संताप पाहण्यास मिळाला. तब्बल पाच तास प्रवाशांना विमानातच बसवून ठेवले होते. या विमानात 185 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांनी वारंवार स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांना शिर्डीला कधी पोहोचणा अशी विचारणा केली. पण, प्रत्येकवेळी खराब हवामान आणि तांत्रिक अडचणीचे कारण देण्यात आले. काही प्रवाशांनी विमानाच गोंधळ घातला. त्यानंतर हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. मुंबई विमानतळावर विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना मुंबईहुन शिर्डीला लक्झरी बसने पाठवण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान मुंबईकडे वळविले होते. ATC कडून सिग्नल न मिळाल्याने विमान शिर्डीला उतरू शकले नाही, अशी माहिती समोर आली आहे. या विमानाला सिग्नल न मिळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. तर, खराब हवामानाच्या कारणामुळे हे विमान शिर्डी विमानतळावर न उतरवता मुंबईला वळवण्यात आले होते. प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांचे हीत लक्षात घेता हा निर्णय घेतला होता, अशी माहिती स्पाईस जेटकडून देण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या