मंत्र्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर 15 कोटींची उधळपट्टी, कुठल्या नेत्याच्या घरावर किती होणार खर्च?

मंत्र्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणावर 15 कोटींची उधळपट्टी, कुठल्या नेत्याच्या घरावर किती होणार खर्च?

मंत्री झाल्यानंतर प्रत्येक मंत्री हा आपल्या मनाप्रमाणं घराची सजावट करत असतो. त्यासाठी बऱ्याचवेळा तोडफोडही केली जाते.

  • Share this:

मुंबई 12 फेब्रुवारी : राज्यात नवं सरकार आलं की मंत्र्यांच्या घरांचा प्रश्नही गाजत असतो. जुने नेते लवकर घर सोडत नाहीत आणि नव्या मंत्र्यांना राहायला घर मिळत नाही याची चर्चा कायम केली जाते. महाविकास आघाडीच्या सरकारला आता तीन महिने होत आलेत. मात्र मंत्र्यांच्या घरांवरून गेले काही दिवस चर्चा सुरु आहे. सुरुवातीला मंत्र्यांच्या घर वाटपावरून मानापमान नाट्य घडलं होतं. सुरुवातीला वाटलेली घरं नंतर ज्येष्ठतेनुसार बदलण्यात आली होती. आता या घरांच्या नुतनीकरणावर होत असलेल्या उधळपट्टीवरून टीका होत आहे.

मंत्र्यांच्या 31 बंगल्यांचं नुतनीकरण्यासाठी सार्वजनीक बांधकाम विभागाने एक निविदा काढली आहे. 15 कोटीचं खर्च त्यासाठी दाखविण्यात आलाय. यात काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यांवर सर्वाधिक खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

मुंबई 23 बांगलादेशींना अटक, 'मनसे'च्या मोर्चानंतर पोलिसांची धडक कारवाई

मंत्री झाल्यानंतर प्रत्येक मंत्री हा आपल्या मनाप्रमाणं घराची सजावट करत असतो. त्यासाठी बऱ्याचवेळा तोडफोडही केली जाते. घरांमधल्या पडद्यांपासून ते फ्लोअरिंग पर्यंत सगळंच बदललं जातं. या सततच्या बदलांमुळे मुळ बंगल्याच्या वास्तूलाच धक्का पोहोचवला जातो असंही म्हटलं जातं.

सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना

साधारणत: एका बंगल्यावर ८० लाख ते दीड कोटींचा खर्च. सर्वात जास्त खर्च राॅयल स्टोन बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळांच्या बंगल्यावर होत आहे

राॅयल स्टोनसाठी १ कोटी ८१ लाख तर रामटेकसाठी १ कोटी ४८ लाखांचा खर्च होत आहे

राॅयल स्टोन :- १ कोटी ८१ लाख

रामटेक :- १ कोटी ४८ लाख

मेघदूत :- १ कोटी ३० लाख

सातपुडा :- १ कोटी ३३ लाख

शिवनेरी :- १ कोटी १७ लाख

अग्रदूत:- १ कोटी २२ लाख

ज्ञानेश्वरी :- १ कोटी १ लाख

पर्णकुटी :- १ कोटी २२ लाख

सेवासदन :- १ कोटी ५ लाख

यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या डागडुजीसाठी तब्बल ९२ लाख खर्च करण्यात येणार आहेत

First published: February 12, 2020, 2:49 PM IST

ताज्या बातम्या