2017ला निरोप देण्यासाठी रेल्वे प्रशासनाचं 'गुडबाय गिफ्ट'; तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल

2017ला निरोप देण्यासाठी रेल्वे प्रशासनाचं 'गुडबाय गिफ्ट'; तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल

पश्चिम रेल्वेनं ८ आणि मध्य रेल्वेनं ४ विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

28 डिसेंबर : 2017ला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांसाठी रेल्वे प्रशासनानं 'गुडबाय गिफ्ट' दिलं आहे. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक लोक बाहेर पडतात. त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं ८ आणि मध्य रेल्वेनं ४ विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेहमी  प्रवाशांना रडवणाऱ्या रेल्वेच्या या निर्णयाचा सगळ्यांना नक्कीच फायदा होईल.

हे आहे विशेष रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

विरारहून सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक

रात्री १२.१५ वा.ची लोकल चर्चगेटला रात्री १.४७ वा. पोहोचेल.

रात्री १२.४५ वा.ची लोकल चर्चगेटला रात्री २.१७ वा. पोहोचेल.

रात्री १.४० वा.ची लोकल चर्चगेटला पहाटे ३.१२ वा. पोहोचेल.

पहाटे ३.०५ वा.ची लोकल चर्चगेटला पहाटे ४.३७ वा. पोहोचेल.

चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक

रात्री १.१५ वा.ची लोकल विरारला पहाटे २.५५ वा. पोहोचेल.

रात्री २ वा.ची लोकल विरारला पहाटे ३.४० वा. पोहोचेल.

रात्री २.३० वा.ची लोकल विरारला पहाटे ४.१० वा. पोहोचेल.

पहाटे ३.२५ वा.ची लोकल विरारला पहाटे ५.०५ वा. पोहोचेल.

मध्य रेल्वेच्या गाड्यांचं वेळापत्रक

सीएसएमटीहून रात्री १.३० वा.ची लोकल कल्याणला पहाटे ३ वाजता पोहोचेल.

कल्याणहून रात्री १.३० वा.ची लोकल सीएसएमटीला पहाटे ३ वाजता पोहोचेल.

हार्बरवरील गाड्यांचं वेळापत्रक

सीएसएमटीहून रात्री १.३० वा.ची लोकल पनवेलला पहाटे २.५० वा. पोहोचेल.

पनवेलहून रात्री १.३० वा. ची लोकल सीएसएमटीला रात्री २.५० वा. पोहोचेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 09:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading