SPECIAL REPORT : संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे कुणाचा होणार फायदा?

SPECIAL REPORT : संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे कुणाचा होणार फायदा?

संजय राठोड ज्या पश्चिम विदर्भात येतात, त्या यवतमाळ भागात पूर्वी काँग्रेस आता भाजप आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ल होता.

  • Share this:

मुंबई, 01 मार्च : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan case) शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना अखेर वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. "असंगाशी संघ प्राणाशी गाठ" ही मराठीत म्हण आहे, म्हणजेच  नको ती संगत लागली की जीवावर बेतनार हे नक्की. तेच संजय राठोड यांच्या बाबतीत झालं आहे.

पूजा चव्हाण हिची आत्महत्या की हत्या हा पोलीस तपासाचा विषय आहे. पण संजय राठोड यांचे आणि पूजा चव्हाण यांचे संबंध लपून राहिले नाही. संजय राठोड यांचा स्वार्थ कारणीभूत ठरला यात दुमत नाही. या सर्व प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्यात अनेकाचा हेतू पूर्ण झाला. गेल्या वर्षभरापासून महाआघाडी सरकारच्या विरोधात रान उठवूनही विरोधकांच्या हाताशी काही लागलं नाही. पण ऐन अधिवेशनाच्या मुद्यावर प्रकरण लावून धरल्याने विरोधकांना पाहिलं यश मिळालं.

संजय राठोड ज्या पश्चिम विदर्भात येतात, त्या यवतमाळ भागात पूर्वी काँग्रेस आता भाजप आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ल होता. सेनेनं तो ताब्यात घेतला. काही असलं तरी शिवसेनेचा पालकमंत्री असलेल्या यवतमाळला राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा ब्रेक मिळाला. बंजारा मतांची समसमान विभागणी संजय राठोड यांच्यामुळे झाली होती. राठोड यांच्या राजीनामा आणि राजकीय खच्चीकरणामुळे नक्कीच भाजप-राष्ट्रवादी स्वतःचा विस्ताराला मोठी संधी आहे. यात शंकाच नाही.

विरोधकांपेक्षा सेने अंतर्गत अनेकांना संजय राठोड यांच्याबाबत राजकीय छुपा संघर्ष होताच. सेनेमध्ये मुंबईतील नेते आणि ग्रामीण भागातील नेते असे सरळ दोन भाग आहेत. ग्रामीण चेहरा सेनेत वरचढ होणार नाही याचा पद्धतशीर बंदोबस्त मुंबईत केला जातो याची अनेक उदाहरण समोर आहे. गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, गुलाब गावंडे, बबन घोलप, आशिष जैस्वाल  यासारखे एकाहून एक उदाहरण देता येईल.

विधानसभा पूर्वी बंजारा समाजाचे मोठाले मेळावे अनेकांच्या भुवया उंचावणारे होते. या भीतीतून की काय संजय राठोड प्रकरणाला हवा दिली जाईल याची पद्धतशीर आखणी सेने अंतर्गत काहींनी केली याची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळातला एक समर्थक कमी करून शिंदे यांच्या ताकदीला देखील कात्री लावण्याचे संकेत आहेत. आदित्य ठाकरे आणि धनंजय मुंडे यांच्या मुद्यावरून सतत उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारवर जी चिखलफेक सुरू होती. त्याला देखील संजय राठोड राजीनाम्यामुळे सरकारच्या आणि मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेला दिलासा मिळेल यात शंका नाही.

Published by: sachin Salve
First published: March 1, 2021, 9:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या