SPECIAL REPORT : राजभवन झाले नवे सत्ता केंद्र, उद्धव ठाकरे कसा काढतील मार्ग?

SPECIAL REPORT : राजभवन झाले नवे सत्ता केंद्र, उद्धव ठाकरे कसा काढतील मार्ग?

राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातला सत्ता संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षात प्रथमच दिसू लागला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : राज्याचे मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगला हे सत्ताधारी पक्षाच्या सत्तेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. मात्र, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी 'वर्षा' या बंगल्यापेक्षा 'मातोश्री' इथूनच कामकाज चालवत आहे. राज्यात 'मातोश्री' बंगल्याबरोबरच राजभवन हे देखील एक सत्तेचं पर्यायी समांतर केंद्र निर्माण झालं आहे, अशी चर्चा आता रंगली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्य सरकारमध्ये अधिक हस्तक्षेप करता यावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. पण तरीदेखील राज्यपाल यांनी योग्य वाटेल तीच भूमिका घेत राहिले आणि सरकारमधील वेगवेगळ्या यंत्रणांना सूचना करत राहिले. नेमकं हेच महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांना बोचत असल्याने राज्यपालांवर टीकेचा सूर लावला होता.

हेही वाचा -'त्या' दिवशी काय कष्ट घेतले? संजय राऊतांचा पियूष गोयल यांना थेट सवाल

मात्र, टीका करणारे नेते अलीकडच्या काळात  राज्यपाल यांना भेटत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात 'मातोश्री' हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान केंद्रबिंदू आहेच पण त्याचवेळी राजभवन देखील सत्तेचं एक केंद्रबिंदू झालं आहे, असा चर्चेचा विषय झाला आहे.

राज्यात सत्ताकेंद्र हे नेहमी वर्षा बंगला राहिले आहे. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून बहुतेक कामकाज 'मातोश्री' येथून सुरू आहे. आता राजभवन ही एक सत्ता केंद्र झाले आहे. वरिष्ठ राज्यकीय नेते मंडळींच्या राजभवनावर गाठीभेटी तर होतातच, त्याचवेळी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकाही होत आहेत. भाजप नेते हे कोणत्याही कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अथवा कॅबिनेट मंत्र्यांना भेटत नाही. ते निवेदन घेऊन थेट राजभवनावर पोहोचता आणि राज्यपाल देतात. यातूनच भाजपने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यासमोर समांतर सत्ता केंद्र निर्माण केले आहे.

हेही वाचा - शरद पवार राज्यपालांच्या भेटीला

त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेताना मंत्र्यांना लिखीत शपथ पलिकडे जात वक्तव्य करतात, त्यावरून राज्यपाल यांनी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना खडसावणे, राज्यपाल नियुक्त विधान परिषद जागा, रिक्त विधान परिषद निवडणूक, विद्यापीठ परीक्षा सारखे मुद्दे तसंच कोरोना आढावा बैठका घेऊन राज्यपाल यांनी राजपाल हे महत्वाचे स्थान असून फक्त रबर स्टॅम्प नाही हे दाखवून दिले.

राजभवन, राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातला सत्ता संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षात प्रथमच दिसू लागला आहे.

राज्यपाल हे शपथ देणे, विद्यापीठ कुलपती नामधारी, राज्यपाल फक्त रबर स्टॅम्प ही सामान्य लोकांच्या मनातील प्रतिमा पुसट करतानाच केंद्र सरकार वरदहस्त भूमिकेने राज्यपाल नवे सत्ता केंद्र तयार करू शकतात हेच दिसून आले आहे. यापूर्वी राज्यपाल आणि सत्ताधारी पक्ष यांच्यातला महाराष्ट्रामध्ये टोकाचा संघर्ष फारसा झालेला दिसत नाही. आता मात्र, सुरू झालेला हा वाद नेमका पेल्यातील वादळ राहणार ही महाराष्ट्राच्या राजकारणात नवी त्सुनामी आणणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 25, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading