News18 Lokmat

कचऱ्यावर मात करणारी 'विजय'नगर काॅलनी, शून्य कचऱ्याचा शंभर नंबरी प्रकल्प

या प्रकल्पामुळे कॉलनीतला वर्षभरातला तब्बल १०० टन कचऱ्याचा बोजा महापालिकेकडे जात नाही.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 5, 2017 10:47 PM IST

कचऱ्यावर मात करणारी 'विजय'नगर काॅलनी, शून्य कचऱ्याचा शंभर नंबरी प्रकल्प

रेणुका जोशी,मुंबई

05 मे : मुंबईतल्या अंधेरीच्या विजयनगर कॉलनीमध्ये शून्य कचरा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवला जातोय. या प्रकल्पामुळे कॉलनीतला वर्षभरातला तब्बल १०० टन कचऱ्याचा बोजा महापालिकेकडे जात नाही.

शहरातला कचरा कमी करण्यासाठी, घनकचरा व्यवस्थापनासाठी, या कॉलनीतल्या नागरिकांनी पुढाकार घेतलाय. रोजचा तब्बल १५० किलो ओला कचरा, १५० किलो सुका कचरा आणि सॅनिटरी नॅपकिन्स,डायपर्सचा ४० किलो कचरा जमा होतो. ओला कचरा खतनिर्मितीसाठी कंपोस्ट पीटसमध्ये नेला जातो. सुका कचरा पुनर्निमितीसाठी आकार या एनजीओला दिला जातो आणि डायपर्ससारखा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर पाठवला जातो.

कॉलनीमध्ये उभारण्यात आलेल्या पिटसमध्ये हा कचरा रोजच्या रोज ढवळला होतो. कचऱ्याचं खतात रुपांतर करण्यासाठी लागणाऱ्या विघटनशील जीवाणूंचा साठा या हौदात टाकलेला असतो. १० पिट्समध्ये टाकलेला सर्व कचरा रोज ढवळला जातो, तयार झालेल्या खताला ऊन देण्यासाठी ते गच्चीत पसरलं जातं. आणि क्रशरच्या साहाय्यानं ते खत बारीक केलं जातं. ३ परिसर भगिनी या कचऱ्याचं अक्षरश: सोनं करतात.

विजयनगरच्या या मोहिमेला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. वर्षा बापट,सुकृता पेठे आणि सुसज्ज स्वयंसेवकांची फौज यामुळेच हे शक्य होतं.

Loading...

याव्यतिरिक्त आंब्याच्या कोई, जांभळाच्या, फणसाच्या, चिकूच्या बिया उन्हात वाळवून माती आणि खत मिसळून पिशवीत भरल्या जातात. एक दीड फुटापर्यंत वाढ झाल्यानंतर हरियाली या संस्थेला दिल्या जातात. आणि यासाठी कॉलनीतले लिटिल फार्मर्स पुढाकार घेतायत. पुढच्या पिढीपर्यंत खऱ्या अर्थानं हे बाळकडू पोचतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2017 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...