SPECIAL REPORT : उद्धव ठाकरेंनी 'का' घेतले एक पाऊल मागे, काय होता 'तो' निर्णय

आजवर युतीत मोठा भाऊ म्हणून मिरवलेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत लहान भावाची भूमिका बजवावी लागत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2019 09:41 PM IST

SPECIAL REPORT : उद्धव ठाकरेंनी 'का' घेतले एक पाऊल मागे, काय होता 'तो' निर्णय

मुंबई, 07 ऑक्टोबर : आजवर युतीत मोठा भाऊ म्हणून मिरवलेल्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत लहान भावाची भूमिका बजवावी लागत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी युती केली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणत असले तरी राजकारणाच्या सारीपाटावर सेनेनं सत्तेसाठी एक पाऊल मागे घेतल्याचं आता लपून राहिलं नाही.

युतीच्या जागा वाटपात शिवसेनेनं थोडं नमतं घेतल्याची कबुली खुद्द उद्धव ठाकरेंनी दिली. खरंतर युतीच्या जागा वाटपावरुन भाजप-सेनेत बराचं खल झाला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तर सेनेच्या नेत्यांनी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याचं स्वप्न रंगवलं होतं. पण, वास्तवात शिवसेनेला २८८ पैकी १२४ जागांवर समाधान मानावं लागलंय.

महाराष्ट्रच्या विकासाची भाषा वापरत प्रत्यक्षात सत्तेसाठी ही तडजोड केल्याचं अखेर उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. तीन दशकांपासून तुझं माझं जमने आणि तुझ्या वाचून करमेना या नाटकाचा यशश्वी प्रयोग करणाऱ्या युतीत आता भाजपचं मोठा भाऊ झाला. यंदा सेनेच्या वाट्याला तुलनेत कमी जागा आल्या असल्या तरी शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होईल, अशी उद्धव ठाकरेंना आशा आहे.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आदित्य ठाकरेंना सेनेकडून भावी उपमुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं. वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.शिवसेनेनं एकीकडं आदित्यला थेट मंत्रालयांच्या सहाव्या मजल्यावर धाडायचे स्वप्न पाहिलंय. पण त्यांचा सावध पवित्रा खूपचं बोलका आहे.

===========================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 09:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...