SPECIAL REPORT : 'चल फूट माझ्या विभागातून' यादी जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपात राडा!

SPECIAL REPORT : 'चल फूट माझ्या विभागातून' यादी जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपात राडा!

मागाठाणेची जागा शिवसेनेला सुटल्यानं भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच शिवसेनेकडून भाजपला हिणवणारं कार्टुन व्हायरल झालं आहे. त्यामुळं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात शक्तीप्रदर्शन केलं आहे.

  • Share this:

सत्यम सिंह, प्रतिनिधी

बोरिवली, 01 सप्टेंबर : मागाठाणेची जागा शिवसेनेला सुटल्यानं भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच शिवसेनेकडून भाजपला हिणवणारं कार्टुन व्हायरल झालं आहे. त्यामुळं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात शक्तीप्रदर्शन केलं आहे.

मागाठाणेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ ही अशी घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे बोरिवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भाजपच्या वाट्याला असलेल्या मागाठाणे मतदारसंघ शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांना मिळाल्यानं भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच व्हायरल झालेल्या ह्या कार्टुननं आगीत तेल ओतण्याचं काम केलं.

मागाठाणे मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचं सांगून शिवसेनेनं भाजपला कार्टुनमधून हिणवलं. शिवसेना नगरसेविका भोईर यांच्या पतीनं हे कार्टुन काढून व्हायरल केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यामुळं युतीचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचा फॉर्म भरण्यासाठी दरेकरांनी जावू नये यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीली हा असा घेरावा घातल्याचं पाहायाला मिळलं. प्रवीण दरेकरांनी ही उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असल्याचे संकेत दिले.

मागाठाणेत भाजप कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे बोरिवलीत शिवसेनेच्या समर्थकांनी प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनामध्ये घोषणाबाजी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. दरम्यान, कार्टुन काढणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

युतीची घोषणा आणि त्यानंतर झालेल्या जागावाटामुळं अनेक जागांची आदलाबदल झाली. विद्यमान आमदारांची जागा युतीला सुटल्यामुळं उघड नाराजी व्यक्त होत आहे. त्याचा फटका पक्षाला बसू नये यासाठी आता दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 07:53 PM IST

ताज्या बातम्या