SPECIAL REPORT : युतीमध्ये कोणकोणत्या जागांची निघाली एक्सचेंज ऑफर, आयारामांच्या हाती काय?

SPECIAL REPORT : युतीमध्ये कोणकोणत्या जागांची निघाली एक्सचेंज ऑफर, आयारामांच्या हाती काय?

दोन्ही पक्षात झालेलं इन्कमिंग आणि मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार या जागांची अदलाबदल होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीमध्ये किमान २० ते २५ जागांची अदलाबदल होऊ शकते. दोन्ही पक्षात झालेलं इन्कमिंग आणि मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार या जागांची अदलाबदल होणार आहे.

विधानसभेसाठी युती करताना काही जागांची अदलाबदल होणार असल्याचं खरंतर स्वतः उद्धव ठाकरेंनीच स्पष्ट केलं आहे. पण तरीही नेमक्या कोणत्या जागांची अदलाबदली होऊ शकते हेही पाहण्याचं ठरणार आहे.

कोणती जागा कोणासाठी सोडली जाणार?

नायगाव - कालिदास कोळंबकर(भाजप)

सिल्लोड - अब्दुल सत्तार( शिवसेना)

उस्मानाबाद - राणा जगजितसिंह(भाजप)

अकोले - वैभव पिचड(भाजप)

गोरेगाव - सुभाष देसाई(शिवसेना)

ऐरोली - संदीप नाईक(भाजप)

एक्सचेंज ऑफरमधील बहुतांश जागा या आयारामांसाठीची अॅडजेस्टमेंट असल्याचं सांगितलं जातं आहे. याशिवाय मुंबईतील वडाळासह इतर 4 ते 5 जागांचीही अदलाबदली होऊ शकते.

गेल्या निवडणुकीत हरलेल्या बहुतांश जागा या सेनेच्या खात्यातील आहेत. म्हणूनच अशा जागांवर भाजपने दावा ठोकू नये म्हणून शिवसेनेनं त्यात्या ठिकाणी याआधीच तुल्यबळ उमेदवाराला सेनेच्या गोटात ओढून घेतलं आहे. विशेषत: सोलापूर आणि नगर जिल्ह्यात हे प्रकर्षाने जानवलंय. त्यामुळे आघाडीचा आमदार जिंकलेल्या जागांबाबत नेमका काय निर्णय होतोय हे पाहणंही मोठं रंजक ठरणार आहे.

================================

Published by: sachin Salve
First published: September 10, 2019, 8:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading