S M L

का भडकले मनसेचे शिलेदार राज ठाकरेंवर ?, काय घडलं कृष्णकुंजवर ?

"नाही, मराठीचा मुद्दा, ही मी लोकांना दिलेली कमिटमेंट आहे. ती मी सोडणार नाही, भले मतं नाही मिळाली तरी चालेल"

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 07:53 PM IST

का भडकले मनसेचे शिलेदार राज ठाकरेंवर ?, काय घडलं कृष्णकुंजवर ?

विवेक कुलकर्णी, मुंबई

20 एप्रिल : 'मातोश्री'नंतर 'कृष्णकुंज' हे ठाकरे घराण्याचं सत्ता केंद्र...त्यामुळे दोन्ही ठिकाणी ठाकरेंचाच आवाज हा कायम राहिला. पण, पहिल्यांदाच कृष्णकुंजवर राज ठाकरे यांच्यावरच मनसेचे कार्यकर्ते भडकले. नुसते भडकले नाहीतर राज ठाकरेंनाच पराभवासाठी जबाबदारही धरलं.

असं म्हणतात, यशाचे अनेक बाप असतात, अपयश मात्र, नेहमीच पोरकं असतं...मनसेच्या पराभवाच्या बाबतीतही काहिसं असंच घडताना दिसतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी पक्षाच्या पराभवाचं खापरही परस्परांच्या डोक्यावर फोडलंय. त्यामुळे चिंतन राहिलं बाजुला आणि अपयशाचे धनी कोण यावरून मनसेत तूतूमैमै सुरू झालीय."होय, मनसेच्या पराभवाची जबाबदारी माझी आहे..."राज ठाकरेंचं हे अगदी महिन्याभरापूर्वीचं विधान, पण त्याचाच त्यांना विसर पडलेला दिसतोय. कारण गुरूवारच्या पक्षाच्या मुंबईतल्या बैठकीत राज ठाकरें पराभवाचं सगळं खापर दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवरच फोडून मोकळे झालेत..

राज ठाकरे आणि नेत्यांमध्ये नेमका काय संवाद झाला ?

राज ठाकरेंचा आरोप-

Loading...

पक्षवाढ आणि इतर विषयांबद्दलची माझी भूमिका लोकांपर्यंत पोचवण्यात दुसऱ्या फळीतले नेते कमी पडले

दुसऱ्या फळीतील नेत्यांचा प्रतिवाद -

 महत्वाच्या मुद्यांवर पक्ष भूमिका घेत नसल्याची कार्यकर्ते तोंडावर बोलून दाखवत आहेत.

निवडणुका जिंकायच्या असतील तर आपण मराठीसोबतच अन्यभाषिकांचाही विचार केला पाहिजे.

राज ठाकरेंचं प्रत्युत्तर - नाही, मराठीचा मुद्दा, ही मी लोकांना दिलेली कमिटमेंट आहे. ती मी सोडणार नाही, भले  मतं नाही मिळाली तरी चालेल.

बैठकीदरम्यान, राज ठाकरेंनी नेत्यांना कानपिचक्या दिल्याचं बाळा नांदगावकरांनी मान्य केलं. पण कुटुंबंप्रमुख म्हणून त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी राज ठाकरे खरंतर आतातरी आत्मचिंतन करतील आणि नव्या दमाने कामाला लागतील, असं वाटलं होतं. पण त्यांनीही पक्ष नेत्यांवरच पराभवाचं खापर फोडण्यात धन्यता मानल्याने मनसेचं यापुढचं भवितव्य नेमकं काय असेल हे इथं वेगळं सांगायला नको..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 06:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close