• SPECIAL REPORT : पूल की मृत्यूची टांगती तलवार?

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 11:46 PM IST | Updated On: Mar 14, 2019 11:46 PM IST

    14 मार्च : मुंबईतल्या पुलानं पुन्हा नागरिकांचा जीव घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा पूल कोसळला. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाच जणांना जीव गमवावा लागला. शहरातल्या धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पुलाच्या ज्या भागावरून नागरिक ये-जा करतात तोच भाग कोसळला. ऐन रहदारीच्या वेळी ही घटना घडल्यानं मोठा हाहाकार उडाला. मुंबई महापालिकेच्या जवळ हा धोकादायक पूल होता. पण प्रशासनाला जर त्यांच्या मुख्यालयाशेजारचा धोकादायक पूल दिसत नसेल तर शहरातल्या इतर पुलांची चर्चाच करायला नको. शहरातल्या सर्व पूलांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे. असं असताना हा पूल स्ट्रक्चर ऑडिटमध्ये का सापडला नाही ? हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. पण धक्कादायक बाब म्हणजे स्ट्रक्चर ऑडिटमध्ये फक्त किरकोळ दुरूस्ती सुचवण्यात आली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी