S M L
  • VIDEO : एकटा पडला 'राजा', मनसे लोकसभा लढणार?

    Published On: Feb 11, 2019 11:23 PM IST | Updated On: Feb 11, 2019 11:23 PM IST

    11 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मनसेबाबत भाष्य केल्यानंतर आता राज ठाकरेंसमोरचा पेच वाढला आहे. 'राज ठाकरे आज जरी काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले तरीही येत्या निवडणुकीत ते आमच्यासोबत राहतील असं वाटत नाही' असं भाष्य सांगोल्यातल्या सभेत शरद पवारांनी केलं. त्यामुळे राष्ट्रवादीची जवळीक साधणारे राज ठाकरे पेचात सापडले आहे. राज यांनी आज तातडीने सर्व शिलेदारांची कृष्णकुंजवर बैठक घेतली. 'लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. निर्णय झाल्यास आपण स्वत: जाहीर करणार', असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close