Elec-widget

SPECIAL REPORT : मनसे लढणार, युतीला धक्का देण्यासाठी असा रचला प्लॅन?

SPECIAL REPORT : मनसे लढणार, युतीला धक्का देण्यासाठी असा रचला प्लॅन?

'मतदान हे ईव्हीएमवर होणार असल्याने निवडणूक लढवावी की नाही याबाबत मनसेनं आपल्या पदाधिकाऱ्यांचीही मतं जाणून घेतली. त्यात सर्वच पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवावी'

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : नाही हो नाही हो करत अखेर मनसेनंही विधानसभा लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. एवढंच नाहीतर युतीमधील नाराजांनाही गळाला लावण्याची तयारी मनसे चालवली आहे.

ईव्हीएमवर शंका उपस्थित करत राज ठाकरेंनी थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याची मागणी इतर पक्षांना केली होती. पण त्यांची ही मागणी सर्वच पक्षांनी फेटाळून लावल्याने अखेर आता मनसेही ईव्हीएमवरच निवडणूक लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. स्वतः बाळा नांदगावकरांनीच यासंबंधीचे स्पष्ट संकेत दिले आहे.

मतदान हे ईव्हीएमवर होणार असल्याने निवडणूक लढवावी की नाही याबाबत मनसेनं आपल्या पदाधिकाऱ्यांचीही मतं जाणून घेतली. त्यात सर्वच पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवलीच पाहिजे, अशी आग्रही पक्षप्रमुखांकडे केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेनं 25 उमेदवारांची पहिली यादी फायनल देखील केली असून किमान निम्म्या जागांवरही मनसे उमेदवार देणार आहे. पण त्यासाठी युतीमधील काही नाराज मंडळी गळाला लागतात का याबाबतही चाचपणी सुरू आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मनसे नाशिक मधील 15 पैकी 15 जागा लढणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी दिली आहे. अभिजीत पानसे आणि संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या बैठक पार पडली. या बैठकीला नाशिकच्या 15 विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सर्वच्या सर्व जागा लढण्याचा आग्रह धरला असून या सर्व जागा वर उमेदवार दिले जातील अशी माहिती संदीप देशपांडे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली.

Loading...

==============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 07:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...