बेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा

बेटी बचावच्या बाता करणाऱ्या सरकारकडूनच महिला सुरक्षेचे तीनतेरा

न्यूज१८ लोकमतचा स्पेशल रिपोर्ट

  • Share this:

स्वाती लोखंडे, प्रतिनिधी

मुंबई, २५ सप्टेंबर- मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या रेल्वेने दिवस- रात्र लाखो प्रवासी प्रवास करतात. अगदी रात्री शेवटच्या ट्रेननेही कित्येक महिला प्रवास करतात. सर्वसाधारणपणे रात्री ११ नंतर महिलांचा फर्स्ट क्लासचा आणि पुढील डबा हा पुरूषांसाठीही खुला असतो. मात्र हेच सो कॉल्ड सुशिक्षित प्रवासी रात्री ११ च्या आधीच महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून सर्रास प्रवास करतात. यामुळेच स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे प्रवासी आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा पडला.

रात्री १०.४५ च्या सुमारास विरार लोकलमध्ये नेहमीप्रमाणे चढण्याची प्रवाशांची घाई होती. पण महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात महिला प्रवाशांसोबत पुरूष प्रवासीही चढले. जर फर्स्ट क्लासच्या डब्यात हे घडत असेल तर सेकंड क्लासच्या डब्याबद्दल काही बोलायचीच सोय नाही. सर्वसाधारणपणे रात्री ११ नंतर महिलांचे काही डबे हे जनरल होतात. पण ११ वाजण्याच्या आधीच पुरूष प्रवासी महिला डब्यात चढायला लागतात.

धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सुरक्षा रक्षकांसमोरच सुरू असतो. पुरुष प्रवासी वेळेआधीच केवळ एका ट्रेनमध्ये चढतात असं नाही. अशा अनेक ट्रेन आहेत. एकतर महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. रात्री उशीरा प्रवास करणाऱ्या महिलांचीही संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे रात्री ११ ते ७ या वेळेत पुरुष प्रवाशांना महिला डब्यात चढण्याचा नियमच रद्द करावा अशी मागणीही महिला प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. पण या सगळ्या प्रश्नांकडे प्रशासन केव्हा लक्ष देणार याचं उत्तर मात्र कोणाकडेही नाही.

First published: September 25, 2018, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading