SPECIAL REPORT : करून दाखवलं? मुंबई पालिकेत यापुढे नोकरभरती नाही!

SPECIAL REPORT : करून दाखवलं? मुंबई पालिकेत यापुढे नोकरभरती नाही!

३० हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे आणि त्यामुळेच महापालिकेनं यापुढे नोकरभरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

प्रणाली कापसे, प्रतिनिधी

मुंबई, 06 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेत काम करण्याचं अनेक होतकरूंचं स्वप्न आता केवळ स्वप्नचं राहणार आहे. कारण देशातली सगळ्यात श्रीमंत आणि आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेत यापुढे नोकरभरती होणार नाही.

३० हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे आणि त्यामुळेच महापालिकेनं यापुढे नोकरभरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा फतवाचं महापालिका प्रशासनानं घेतला आहे.

मुंबई महापालिकेवर सध्या ९० हजारांहून अधिक कामगाराचं घर चालतं. यात कामगार, इंजिनियर, कर्मचारी अशा सगळ्यांचा समावेश आहे. देशाच्या आर्थिक राजधानीची जबाबदारी कंत्राटदारांच्या कामगारांवर कशी सोपवता येईल? असा सवाल कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.

कामगार भरतीवर गदा आणण्यापेक्षा मुंबई महापालिकेनं आपली उत्पन्नाची साधनं अधिक बळकट करणे आवश्यक आहे . तसंच अनावश्यक खर्च टाळल्यास महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. मात्र, सत्ताधारी शिवसेनेला हे कधी उमगणार हाच खरा प्रश्न आहे.

====================

Published by: sachin Salve
First published: October 6, 2019, 8:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading