SPECIAL REPORT : शिवसेनेसाठी 24 तास महत्त्वाचे 'हे' आहे कारण...

युतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असून अवघ्या 10 ते पंधरा जागांवर एकमत होत नाही

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 11:47 PM IST

SPECIAL REPORT : शिवसेनेसाठी 24 तास महत्त्वाचे 'हे' आहे कारण...

मुंबई, 24 सप्टेंबर : भाजप सेना युतीसाठी पुढचे 24 तास अतिशय महत्वाचे असल्याचं सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर युतीसंदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बोलणी सुरू असून लवकरच त्यातून सकारात्मक मार्ग निघेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

युतीमध्ये एकएका जागेसाठी घासाघीस सुरू आहे, हेच संजय राऊत याद्वारे सुचवू इच्छित आहेत. युती होईल तेव्हा होईल पण 2014साली आम्ही सत्तेत सहभागी झालो नसतो तर चित्रं पूर्णपणे वेगळं असतं, अशी खदखद व्यक्त करायलाही ते विसरले नाहीत.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी मात्र, संजय राऊतांच्या विधानांकडे सोईस्कर डोळेझाक करत युती होणारच असल्याचं स्पष्ट केलंय. पण त्याचवेळी ते यावेळी जागावाटपात आम्हीच मोठे भाऊ असणार असल्याचं सुचवायलाही ते विसरले नाहीत.

या दोन्ही नेत्यांच्या म्हणण्यानुसार युतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असून अवघ्या 10 ते पंधरा जागांवर एकमत होत नाही. कारण, छोट्या पक्षाची भूमिका स्वीकारताना शिवसेनेला बऱ्यापैकी जड जातंय. पाहुयात भाजप शिवसेनेला आणखी किती नमवतंय ते..कारण यावेळी युतीची गरज ही भाजपची नाहीतर सेनेची आहे.

======================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2019 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...