SPECIAL REPORT : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या खेळीने आमदारांच्या पोटात आला गोळा?

SPECIAL REPORT : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या खेळीने आमदारांच्या पोटात आला गोळा?

भाजपचं तिकीट म्हणजे विजयाची हमी असं वाटू लागल्यानं नेते मंडळी भाजपच्या दारावर गर्दी करत आहेत. पण भाजपमध्ये असलेल्या विद्यमान आमदारांच्या मनात सध्या मोठी धाकधूक आहे

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : भाजपचं तिकीट म्हणजे विजयाची हमी असं वाटू लागल्यानं नेते मंडळी भाजपच्या दारावर गर्दी करत आहेत. पण भाजपमध्ये असलेल्या विद्यमान आमदारांच्या मनात सध्या मोठी धाकधूक आहे. कारण भाजपचं तिकीट पुन्हा मिळवण्यासाठी मोठ्या अग्नीपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. ज्यांची कामगिरी दमदार तेच आमदार असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप 25 निश्क्रीय विद्यमान आमदारांना घरी बसवण्याच्या तयारीत आहे. अॅन्टीइन्कमबन्सीचा फटका बसू नये म्हणून भाजपनं काही निकषांच्या आधारे आमदारांचं मुल्यमापन केलं आहे. जे आमदार या निकषात बसत नाहीत अशा 25 आमदारांचं भाजपकडून तिकीट कापलं जाणार आहे.

काय आहे निकष?

- कामगिरीनुसारच मिळणार तिकीट

- आमदार म्हणून खराब कामगिरी

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असमाधानकारक कामगिरी

- लोकसभा निवडणुकीत आघाडी मिळवून देण्यात अपयश

या निकषांच्या आधारे भाजपच्या 25 विद्यमान आमदारांचं तिकिट कापलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात यश मिळालं पण या यशामागे दडलेल्या अपयशाचा भाजपनं बारकाईनं अभ्यास केला होता. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या किमान दोन महिने आधीपासून आमदारांची धाकधूक वाढली.

- दोन नामवंत एजन्सीकडून दोन दिवसांआड सर्वेक्षण

- संघ परिवाराशी संबंधित स्वयंसेवी संस्थेकडून माहिती

- संभाव्य उमेदवारांचं ठरवलं रेटिंग

- सर्वेक्षणाच्या माहितीवर तिकिट वाटप

- लोकसभेला विद्यमान सहा खासदारांचं कापलं तिकिट

लोकसभा निवडणुकीच्यावेळी गिरवलेला हाच कित्ता भाजप विधानसभेलाही गिरवणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. कारण, ज्यांची कामगिरी दमदार तेच आमदार ठरणार आहेत.

============================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2019 08:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading