SPECIAL REPORT : पुतण्याविरोधात राज काका उमेदवार उतरवणार का?

SPECIAL REPORT : पुतण्याविरोधात राज काका उमेदवार उतरवणार का?

SPECIAL REPORT : पुतण्याविरोधात राज काका उमेदवार उतरवणार का?

  • Share this:

उदय जाधव, प्रतिनिधी

मुंबई, 30 सप्टेंबर : राज्याच्या राजकारणात आज आदित्योदय झाला. खुद्द आदित्य ठाकरे यांनीच स्वत:च्या उमेदवारीची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांच्या अवघ्या 9 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतील हा महत्वाचा टप्पा. त्याच निमित्तानं युवासेनेनं आदित्य ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेच्या प्रवासाचं एक गाणं प्रसिद्ध केलं आहे. हिच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्याची.

"स्वप्न नवे विश्वास नवा. महाराष्ट्राचा तू श्वास नवा.." नव्या स्वप्नांचा नवा विश्वास म्हणजे आदित्य ठाकरे हे ठसवण्यात शिवसेना यशस्वी ठरली. आदित्य ठाकरेंनी जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यात चार हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण केली. या गाण्यात यात्रेचा प्रवास दाखवण्यात आला.

नऊ वर्षांपूर्वी 17 ऑक्टोबर 2010 रोजी शिवाजी पार्क वरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आदित्य ठाकरेंच्या हाती तलवार देऊन युवासेनाप्रमुख केलं. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षीच आदित्य ठाकरेंचं राजकारणात पदार्पण झालं.

आदित्य ठाकरेंनी राजकारणात आल्याबरोबर त्यांच्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.

मुंबई विद्यापीठाला त्यांचा निर्णय बदलावा लागला. आदित्य ठाकरेंच्या मागणीनंतर रोहिंग्टन मिस्त्री यांचं 'सच अ लॉन्ग जर्नी' हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्याक्रमातून हटवण्यात आलं होतं. त्यासाठी आदित्य ठाकरेंनी जोरदार आंदोलनही केलं. उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी झालेल्या उशिरावर आदित्य ठाकरेंनी आवाज उठवला.

राजकारणाप्रमाणेच खेळाच्या मैदानावरही आदित्य ठाकरे अनेकदा दिसतात. 2017 मध्ये मुंबई डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची निवड झाली. तर 2018 मध्ये शिवसेना नेते म्हणून आदित्य ठाकरेंची वर्णी लागली.

विधानसभा निवडणुका घोषित होण्याच्या आधीच आदित्य ठाकरेंनी जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्याचा झंझावती दौरा केला.राज्यसभेला सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेनं उमेदवार दिला नव्हता. आता त्याची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस करणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसंच मनसे काय निर्णय घेते याकडेही लक्ष लागलंय. राज ठाकरे त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देतात का ? या प्रश्नाच्या उत्तरात आगामी राजकारणाचे संदर्भ मिळणार आहेत.

============================

Published by: sachin Salve
First published: September 30, 2019, 9:25 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading