SPECIAL REPORT : प्रचाराला सुरुवात करण्याआधीच आदित्य ठाकरेंकडून झाली 'ही' चूक?

SPECIAL REPORT : प्रचाराला सुरुवात करण्याआधीच आदित्य ठाकरेंकडून झाली 'ही' चूक?

मराठी अस्मितेसाठी आग्रही असणाऱ्या ठाकरे कुटुंबीयातील युवरांजांना प्रचारासाठी महाराष्ट्रात इतर भाषेचा वापर का करावा लागतोय?

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य ठाकरे आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवं-नवे प्रयोग करताना दिसत आहे. यावेळी मतदारसंघांतील बहुभाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्यांनी त्यांच्या मातृभाषेचा वापर केला खरा; परंतु, मराठी अस्मितेसाठी आग्रही असणाऱ्या ठाकरे कुटुंबीयातील युवरांजांना प्रचारासाठी महाराष्ट्रात इतर भाषेचा वापर का करावा लागतोय?

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरेंनी वरळीच्या गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'केम छो वरली!'चे फलक नाक्यानाक्यावर लावले आणि सोशल मीडियावर एकच हलकल्लोळ माजला. यामुळं कधी काळी मराठीचा जागर करणाऱ्या शिवसेनेला युजवराजांसाठी गुजरातीचा पुळका आला की काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या पोस्ट व्हॉट्सअॅप, फेसबुकवर व्हायरल झाल्या. संबंध ट्विटर विश्व जागे झाले.

ठाकरे घराण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे युवराज हे पहिले ठाकरे ठरले खरे; परंतु, मतांसाठी युवराजांना मराठी बाणा आणि अस्मितेचा विसर पडला की काय, अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. 60च्या दशकात मुंबईतील अर्थकारण, राजकारण आणि समाजकारणांमध्ये मागे पडलेल्या मराठी माणासांचा कैवार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. आवाज कुणाचा... शिवसेनेचा.. या एका घोषणेनं मराठी माणसांमध्ये अंगार फुलवला. मुंबईतलं मराठी माणसाचं अस्तित्व दाखवून दिलं. बाळासाहेबांनंतर मराठीचा वारसा पुढे नेला तो, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी.

मोदींच्या महत्त्वकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर राज ठाकरेंनी जहरी टीका केली. दरम्यान, ईडी चौकशीनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. एरवी, मराठीच्या आग्रहासाठी खंबीर असणारे राज ठाकरे वरळीतील बहुभाषिक पोस्टर्सवर प्रतिक्रिया देणार का आणि पुतण्याच्या विरोधात मनसेचा उमेदवार उभा करणार का? हाच सध्याचा कळीचा मुद्दा आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्यांना महाराष्ट्रात इतर भाषेचा अवलंब का करावा लागला? हा मराठी अस्मितेचा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो.

===================================

First published: October 2, 2019, 9:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading