SPECIAL REPORT : राज ठाकरेंच्या मनात चाललं काय? लोकसभेसाठी आहेत ही पर्याय

SPECIAL REPORT : राज ठाकरेंच्या मनात चाललं काय? लोकसभेसाठी आहेत ही पर्याय

या बैठकीत मनसेनं स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत जायचं यावरून पक्षनेत्यांमध्ये बरीच खलबतं झाल्याचं ऐकायला मिळत आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार,प्रतिनिधी मुंबई, 31 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पक्षनेत्यांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत मनसेनं स्वबळावर लढायचं की आघाडीसोबत जायचं यावरून पक्षनेत्यांमध्ये बरीच खलबतं झाल्याचं ऐकायला मिळत आहे.

मुलगा अमितचं शुभमंगल आणि त्यासोबतच रिसेप्शन सोहळाही यथासांग पार पडल्यानंतर आता कुठे राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागले आहे. यासंदर्भातच सविस्तर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर गुरूवारी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्याला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, अविनाथ जाधव, शिशिर सावंत या नेत्यांनी हजेरी लावली होती. साधारण अर्धा पाऊणतास ही बैठक चालली, त्यात राज ठाकरेंनी आघाडी करण्यासंदर्भात आपल्या सहकाऱ्यांचीही मतं जाणून घेतल्याची माहिती मिळत आहे.

आता आपण मनसेसमोरचे लोकसभेसाठी नेमके काय पर्याय?

पर्याय 1

स्वबळावर निवडणूक लढणे

पण पक्षाची स्थिती लक्षात घेता स्वबळावर जिंकणं कठीण

पर्याय 2

काँग्रेस आघाडीसोबत युती करणे

राष्ट्रवादीसोबतची जवळीक बघता हा पर्याय उत्तम

पण काँग्रेस मनसेला सोबत घेण्यास अनुच्छुक

पर्याय 3

मनसे फक्त राष्ट्रवादीसोबत जाणार ?

कल्याण, ठाणे, नाशिक आणि ईशान्य मुंबईत मनसेची बऱ्यापैकी ताकद

आघाडीत या तिन्ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात

पण या तिन्ही जागा राष्ट्रवादी मनसेला सोडणार का?

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मनसे महाआघाडीत नको असं कितीही नाकारत असले तरी अलीकडच्या काळातली शरद पवार आणि राज ठाकरेंची वाढती जवळीक काही लपून राहिलेली नाही.

विशेषतः अमितालीच्या लग्नात पवार कुटुंबियांनी लावलेली सहकुटुंबं हजेरी खूप काही सांगून जाते. तसंच याच विवाहसोहळ्याला काँग्रेसच्या अहमद पटेलांची हजेरीही अनेकांच्या नजरेत सुटलेली नाही.

थोडक्यात काय तर मनसे आणि आघाडीत नक्कीच काहीतरी शिजतं आहे. पण उघडपणे त्यावर कोणी बोलत नाही. पण लोकसभेसाठी आघाडीसोबत जाणं राजकीय दृष्ट्या खरंच परवडणारं आहे का, याचाही विचार राज ठाकरेंना करावा लागणार आहे. कारण, गेल्या निवडणुकीत शिवसेनेची वाट लावण्याच्या नादात राज ठाकरेंनी भाजपशी छुपी युती केली खरी त्यात मनसेचीच पुरती वाट लागल्याचं सर्वांनीच पाहिलं आहे.

============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 08:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading