29 जानेवारी : मुंबई महापालिकेत संख्याबळ वाढवण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक गळाला लावले होते. मात्र, त्या नगरसेवकांना प्रत्येकी 6 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केला आहे. खुद्द राज ठाकरेंनी ही माहिती दिल्याचा दावा देखील अजितदादांनी केला आहे.