News18 Lokmat

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक

या अधिवेशनात जीएसटीसोबत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी यासाठी विरोधक आक्रमक झालेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 21, 2017 02:57 PM IST

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक

21 मे : राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या अधिवेशनात जीएसटीसोबत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी यासाठी विरोधक आक्रमक झालेत.

जीएसटी आणि महापालिकेची नुकसान भरपाई अशी विधेयक 34 आणि 35 विधानसभेत मंजूर करण्यात आली. ती आज विधान परिषदेत मंजूर होतील. तर काल विरोधक कर्जमाफीवरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले.जीएसटी विधेयक काल राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात सादर करण्यात आलंय.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधेयक मांडलं.

तर दुसरीकडे जीएसटीसोबत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक दिसले.याच विशेष अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी यावेळी राधाकृष्ण विखे - पाटील यांनी केली.जीएसटीबाबत दिल्लीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत आपल्याला स्पष्टता हवी असल्याचं विरोधकांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2017 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...